डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न!

 डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न!

१६५४ श्रीसदस्यांच्या उपस्थितीत नवीन वर्षाच्या संकल्पातून स्वच्छतेचा जागर!

१६५४ श्री सदस्यांनी स्वच्छता करून केले२०२५चे स्वागत !

२४७ पोती कचरा हददपार !

अमेरिका,कॅनडा,सिंगापुर,ऑस्ट्रेलियासह एकवीस देशात रस्ते,पार्क,बीच,नदी,हायवे दत्तक परिसरात स्वच्छता अभियान नियमित सूरू!


प्रतिनिधी/ शेखर जाधव


सातारा जावली .दि.01,समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी,डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी,श्री उमेशदादा धर्माधिकारी,श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.१६५४ सदस्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान संपन्न होऊन मोठयाप्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली.

       शहराच्या पश्चिमेस गेल्या दीड शतकापासुन साताऱ्याला शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा करणाऱ्या कास धरणाप्रती कृतज्ञता व्यकत करण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने कास धरण परिसरात महास्वच्छता मोहिम यशस्वीरित्या राबवून दोन तासात २१६ प्लास्टीक कचऱ्याच्या पोती व ३१ काचेच्या बॉटलच्या पोती असा तब्बल २४७ पोती कचरा हददपार करण्यात आला.

      गेली दीडशे वर्ष कास धरण शुध्द पाणी देऊन सातारकरांची तहान भागवतो.केवळ सातारकरच नव्हे तर आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या आवडीचे निसर्गसौंदर्यसंपन्न असे एकमेव ठिकाण म्हणजे कास धरण.कित्येक पर्यटक वनभोजनाचा आनंद घेतात.दरम्यान नकळत तेथेच कचरा राहून जातो.तर काही विघ्नसंतुष्ट मुद्दामहून त्याठिकाणी कचरा करताना दिसतात.प्लास्टिक कचऱ्याचेदेखील प्रमाण जास्त आहे.यामुळे हाच कचरा पावसाळ्यात तलावात वाऱ्याने वाहत जाऊन पाणी दुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच काचेचा कचरा पाहता वन्य पशू पक्ष्यांना कोणतीही इजा पोहचू नये या पाश्वभुमीवर स्वच्छता मोहिम राबवून 

काचा,स्नॅक्सच्या पिशव्या,दारूच्या बाटल्या, बिसलेरी प्लास्टिक बाटल्या,ग्लास,कागदी बोळयांचा संकलित कचरा नगरपालिकेच्या टिप्पर वाहनाच्या साह्याने कचरा डेपोत नेण्यात आला.

     डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत समर्थ कार्यातून तमाम तरुणाईसमोर कृतीयुक्त आणि वैचारिक आदर्श उभा करणाऱ्या प्रतिष्ठानमार्फत कास धरण परिसरात उद्बोधन फलकासह झालेल्या महास्वच्छता अभियानाने मोठया स्वरूपात जनजागृती होण्यास मदत झाली.यापुर्वीही १०८ किलोमीटर अंतर रस्ता दत्तक परिसर स्वच्छ करण्यासाठी जिल्ह्यात प्रथमच उपक्रम संपन्न झाला होता.

              सातारा,वाई,कोरेगाव,पाटण,नारळवाडी,धोंडेवाडी,कराड,नेहरवाडी,अनवडी,प्रभुचीवाडी,सातारारोड,खातगुण,बुध,निमसोड,म्हसवड,मेढा, गोळेवाडी,नांदगाव,कुडाळ,पुसेगाव,वडूज,मारूल हवेली,किकली,पिलीव(सोलापुर)श्री समर्थ बैठकीतील हजारो सदस्यांनी अभियानात सहभाग घेतला.

  स्वयंशिस्त,उत्तम नियोजनामुळे स्वच्छताअभियान यशस्वीरित्या संपन्न होवून पिण्याचे पाणी,मास्क व हातमोज्यांची व्यवस्था तसेच आवश्यक स्वच्छतेचे साहित्य आणून श्रीसदस्य स्वच्छता अभियान निरपेक्ष भावनेतुन करताना दिसत होते.

चौकट..

कास धरण परिसरात स्वच्छता अभियानाचे नियोजन राज्यपाल नियुक्त स्वच्छतादुत महाराष्ट्रभुषण पद्मश्री डॉ.श्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी,डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी,श्री उमेशदादा धर्माधिकारी,श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असुन यापुर्वी मोठयाप्रमाणावर स्वच्छता अभियाने जिल्ह्यात यशस्वीरित्या संपन्न झाली आहेत.स्वच्छता अभियानातुन स्वच्छतेचा जागर,स्वच्छतेचा सद्गुण तसेच जनजागृती होऊन सर्वस्तरातुन कौतुक होत आहे.

चौकट.

विश्वव्यापक शिकवण!

वसुधैव कुटूंबकम,देशानं मला काय दिलं यापेक्षा मी देशाला काय दिलं?मानव ही जात आणि माणुसकी हा धर्म अशी विश्वव्यापक शिकवण अध्यात्माचे अधिष्ठान लावून त्याला सामाजिक कार्याची जोड देणाऱ्या डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत गेल्या कित्येक वर्षांपासुन भारत देशासह जगभरात अनेकविध समाजहितपयोगी उपक्रम राबवले जातात.अमेरिका,कॅनडा,सिंगापुर,ऑस्ट्रेलियासह विविध एकवीस देशास रस्ते,पार्क,बीच,नदी,हायवे दत्तक परिसरात स्वच्छता अभियान,वृक्षारोपण तसेच प्लाझ्मा डोनेट,रक्तदान शिबीर,महिला कर्करोग जागृती परिषद असे विविध उपक्रम सुरू आहेत.

कोट.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य गौरस्वापद असुन प्रतिष्ठानच्या विविध नाविण्यपुर्ण उपक्रमातुन प्रेरणा मिळत आहे.विविध सामाजिक उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे काम व सेवाभाव पाहता प्रतिष्ठानचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

सतीश बुध्दे,गटविकास अधिकारी,पंचायत समिती सातारा

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.