अखेर हुपरी मधील अनाधिकृत मदरसा पाडला.

 अखेर हुपरी मधील अनाधिकृत मदरसा पाडला.


हुपरी:- गेली अनेक वर्षे हुपरी मधील अनधिकृत मदरसा प्रकरणी अनेक उपोषणे व आंदोलन सुरू होती.अखेर आज त्या मदरसा वर हातोडा पडला.यावेळी हुपरी परिसरातील गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

हातकणंगले तालुक्यातील 

 हुपरीमधील यशवंत नगर या ठिकाणी असलेला वादग्रस्त मदरसाच्या जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना कागदपत्रे मुस्लिम सुन्नीयत जमीयतने नगर प्रशासनाला सादर न केल्याने प्रशासनाने या मदरसाची अतिक्रमण काढण्याची कारवाई आज शनिवारी पहाटेपासूनच सुरू केली .

 दरम्यान ही कारवाई थांबवण्याचे मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन काही काळ शांततेत मुक निदर्शने केली यावेळी जागोजागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, शहरातील सरकारी गायरान भूमी गट क्रमांक 844/अ/1 पैकी मालमत्ता क्रमांक 4489 या मिळकतीवर मुस्लिम सुनियत जमियत ने बेकायदेशीर रित्या उभारलेल्या मदरसा जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम सुन्नीयत जमियतला बजावली होती. मात्र मुस्लिम सुन्नियत जमीयतने शेवटपर्यंत कागदपत्रे व पुरावा सादर केलाच नाही, तसेच सरकारी गायरानावरती बेकायदेशीर रित्या मदरसा बांधकाम केले असल्याचे शासकीय कागदपत्रातून व आतापर्यंत न्यायालयिन कामकाजातून सिद्ध झाल्याने प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटवण्याची कारवाई केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अजय नरळे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यासह मदरसा परिसरातील 100 मीटर अंतरावर संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे हुपरी परिसरात बंद सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे यावेळी हुपरीमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.