बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 461 जनावर कारवाई लातूर पोलिसांची कामगिरी.

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 461 जनावर कारवाई लातूर पोलिसांची कामगिरी.

---------------------------

लातूर/ प्रतिनिधी 

---------------------------

55 मद्यपी वाहन चालकावर गुन्हे दाखल, तर अतिवेगाने, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एकूण 461 वाहचालकांवर लातूर पोलिसांची कारवाई. 03 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल.*


                 नववर्षाचे सेलिब्रेशन करताना दारू पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 55 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या 461 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 03 लाख 41 हजार 200 रुपये इतका दंड वसूल केला आहे.

              नववर्षाचे स्वागत करीत असताना काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालविणारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. त्यामुळे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली आहे. लातूर जिल्ह्याच्या 23 पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्यपान करून वाहन चालविणे स्वतःसाठी व इतरांसाठी धोकादायक असून नागरिकांनी स्वतः व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे, असे आवाहन लातूर पोलिसांकडून वेळोवेळी करण्यात येते.

          सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, संबंधित पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, व पोलीस अमलदारानी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.