"खो-खो वर्ल्ड कप 2025 च्या प्रचारासाठी इचलकरंजीत भव्य रॅली"
"खो-खो वर्ल्ड कप 2025 च्या प्रचारासाठी इचलकरंजीत भव्य रॅली"
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील आय.जी. स्टेडियम येथे होणाऱ्या पहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर खो-खो असोसिएशनतर्फे इचलकरंजीत उत्साहात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीची सुरुवात रा. छ. शाहू महाराज पुतळा येथून झाली आणि ती शिवतीर्थ, जनता चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे राजवाडा चौक येथे समाप्त झाली. या भव्य रॅलीत आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी प्रमुख उपस्थिती लावून उपस्थितांना प्रोत्साहित केले.
आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, खो-खो वर्ल्ड कप हा भारतीय पारंपरिक क्रीडाप्रकाराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा उपक्रम आहे. खेळाडूंसाठी हे प्रेरणादायी पाऊल असून, क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांना व्यापक पाठिंबा मिळाला पाहिजे."
रॅलीत कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी, आजी-माजी खो-खो खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सदर उपक्रमाने खो-खो वर्ल्ड कप 2025 साठी व्यापक जनजागृती घडवली. खो-खो वर्ल्ड कपच्या माध्यमातून भारतीय क्रीडा क्षेत्राला जागतिक पातळीवर मान्यता मिळेल,"असा विश्वास रॅलीतून व्यक्त करण्यात आला.
सर्वांनी या उपक्रमासाठी योगदान द्यावे आणि या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
Comments
Post a Comment