Posts

Showing posts from January, 2025

पैशासाठी अक्षय काढायचा भांडण.भांडणानंतर भाग्यश्रीला संपवले पोलिसांनी केली पतीला अटक.

Image
   पैशासाठी अक्षय काढायचा भांडण.भांडणानंतर भाग्यश्रीला संपवले  पोलिसांनी  केली पतीला अटक. ---------------------------------- अमरावती जिल्हा प्रतिनिधी पी.एन.देशमुख. ---------------------------------- अमरावती. अमरावती शहरातील यशोदा नगर भागातील भोवते लेआउट मधील सौ.भाग्यश्री लाडे वय२८, वर्षीय हिचा तिच्या पतीनेच खून केल्याचे गुरुवारी रात्रीसमोर आले दरम्यान फ्रेझर पुरा पोलिसांनी  भाग्यश्रीचा मारेकरी पती अक्षय लाडे ला शुक्रवारी दिनांक 3 रोजी पहाटे अटक केली लग्नात प्रेजेंट कमी आल्याने तो वारंवार पत्नी भाग्यश्रीला माहेरवरून पैसे आणण्यासाठी छळ करित होता .त्याच्याा कारणातून त्यांच्यात भांडण झाले त्या भांडणानंतर नियोजन बद्ध कट रचून, भाग्यश्रीचा गळा आवळून नंतर गळा चिरून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले अक्षय आणि भाग्यश्री यांचा सात वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता .लग्नात तुझ्या माहेरच्यांनी प्रेझेंट कमी दिले  म्हणून तो वारंवार त्रास द्यायचा भाग्यश्री तुझ्या माहेरच्यांनी प्रेझेंट कमी दिले म्हणून तो वारंवार भाग्यश्रीला माहेरवरून पैसे आणायला सांगत होता .मध्यंतरी त्यां...

माळेगाव यात्रेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन.

Image
  माळेगाव यात्रेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन. ------------------------------- लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  ------------------------------- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज श्रीक्षेत्र माळेगाव येथे आयोजित यात्रेस भेट देऊन आनंद व उत्साहाचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेतले आणि यात्रेतील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.      यात्रेदरम्यान घोडेबाजारातील विविध घोड्यांची पारख करत त्यांनी या अनोख्या परंपरेचे कौतुक केले. तसेच शंकरपट स्पर्धेस भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवले. यात्रेच्या चैतन्यमय वातावरणाने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला वेगळाच रंग दिला आहे.     या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलीस निरीक्षक नीलपञे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार उपस्थित होते. यात्रेतील गर्दी, विविध स्टॉलची सजावट व पारंपरिक...

लोहा तालुका अभिव्यक्ता संघाचा अध्यक्षपदी ॲड सतिश ताटे यांची निवड.

Image
  लोहा तालुका अभिव्यक्ता संघाचा अध्यक्षपदी ॲड सतिश ताटे यांची निवड. ----------------------------- लोहा प्रतिनिधी अंबादास पवार  -----------------------------      लोहा तालुका अभिव्यक्ता संघाची नुकतीच दि.३ जानेवारी २०२५ रोजी बैठक घेऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.अध्यक्षपदी ॲड सतिश के ताटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.    कार्यकारिणी पुढील प्रमाणे - अध्यक्ष - ॲड एस के ताटे, उपाध्यक्ष- ॲड एस एम फुके, सचिव - ॲड के बी पौळ, सहसचिव- ॲड सौ उषा चौतमोल, कोषाध्यक्ष- ॲड एक.एम.चव्हाण, ग्रंथालय प्रतिनिधी ॲड व्हि एम दिग्रसकर , महिला प्रतिनिधी ॲड जे एस क्षीरसागर,तर कार्यकारिणी सदस्य म्हणून ॲड जे एस डांगे, ॲड जे पु बाबर,ॲड पी यु कुलकर्णी,ॲड बी आर गायकवाड,ॲड जाधव एस जी,ॲड बी एम गोरे,ॲड चव्हाण व्हि एम, ॲड मोटारवार ए एन, यांची सर्वानूमते बिनविरोध  निवड करण्यात आली .

मन प्रफुल्लित करणारे वातावरण; निसर्ग संपदेसह पाटगाव जलाशयाकडे पर्यटक वाढले.मन प्रसन्नतेसाठी पश्चिम भुदरगडकडे पर्यटकांचा ओढा.

Image
मन प्रफुल्लित करणारे वातावरण; निसर्ग संपदेसह पाटगाव जलाशयाकडे  पर्यटक वाढले.मन प्रसन्नतेसाठी  पश्चिम भुदरगडकडे  पर्यटकांचा ओढा. --------------------------------------- भुदरगड प्रतिनिधी . स्वरूपा खतकर  ---------------------------------------       रोजच्या ताणतणावातून थोडीशी मुक्ती मिळवण्यासाठी आणि मनाला प्रफुल्लित करण्यासाठी लोकांचा पश्चिम भुदरगड परिसराकडे ओढा वाढलेला आहे,'माईंडफूलनेस' साठी भुदरगड तालुक्यातील तीन जलाशय आणि चिवाळे मठगावचा गंगोत्री परिसर हा निश्चितच वरदान ठरत आहे. येथील निसर्ग संपदा आल्हाददायक वातावरण आणि जलाशय याचे नेत्रसुख लुटण्यासाठी अलीकडे पर्यटक संख्या वाढू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा ऑक्सिजन पार्क म्हणून भुदरगड तालुक्याला ओळखले जाते येतील मौनी सागर जलाशय आणि मेघोली चिवाळे कोंडोशी हे मोठे तलाव या धरण क्षेत्रातील दऱ्याखोऱ्यातील आणि मठगाव चिवाळे शिवडाव नाईकवाडी येथील हिरवीगार वनराई याची भुरळ प्रत्येकालाच पडते अलीकडच्या धगधगत्या जीवनात धावपळीच्या युगात माणसाच्या मनाला गारवा मिळावा असे वाटू लागले आहे आणि साहजिकच त्यामुळे कोल्हापूरपास...

भुमिपुत्रच्या युवक तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर सदार यांची निवड.

Image
  भुमिपुत्रच्या युवक तालुका अध्यक्षपदी पत्रकार शंकर सदार यांची निवड. ----------------------------------------  रिसोड प्रतिनिधी.  रणजीत सिंह ठाकुर  ---------------------------------------- रिसोड: : भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या रिसोड तालुका अध्यक्ष युवक पदी पत्रकार शंकर सदार यांची निवड करण्यात आली आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांच्या मान्यतेने पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे. व्हाईस ऑफ मिडीया तालुका सहसचिव समाजासाठी अलेलेली जागृता पाहुन व शेतकर्याच्या प्रश्नाची जाण आणि शेतकऱ्यांशी नाळ जुळलेली असल्याने असल्याने भुमिपुत्रच्या सर्व पदाधिकाऱ्याने युवा पत्रकार शंकर सदार यांच्यावर ही जबाबदारी टाकली असल्याचे विष्णुपंत भुतेकर यांनी यावेळी सांगितले आहे. यावेळी  अकोला जिल्हाअध्यक्ष संजय मालोकार,  जिल्हाध्यक्ष रामेश्वर, अवचार, ड्रा.जितेंद्र गवळी, संतोष सुर्वे, ड्रा. तृप्ती गवळी, देव इंगोले,  बालाजी बोरकर, रवींद्र चोपडे, राजेश डांगे, भीमराव खोडके, देवेंद्र लांडकर, विनोद घुगे, श्रीरंग न...

रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

Image
रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी. ---------------------------------- रिसोड प्रतिनिधी. रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------  रिसोड तालुक्यातील गोवर्धन येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती रेणुकामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोवर्धन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. शिरपूर जैन येथील पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुबोध वाघ होते.यावेळी मंचकावर प्रफुल देशमुख. अजाबराव अंभोरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रा. राजेश अंबाडकर यांनी प्रास्ताविक भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवण्याच्या सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत मुलींनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे रामेश्वर चव्हाण यांनी "सावित्रीच्या लेकी" होण्या...

आमदार भावनाताई गवळी यांचा एक फोन आणि पांदण रस्त्याने घेतला मोकळा श्वास.

Image
  आमदार भावनाताई गवळी यांचा एक फोन आणि पांदण रस्त्याने घेतला मोकळा श्वास. ----------------------------------   रिसोड.प्रतिनिधी   रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------   रिसोड तालुक्यातील मांगवाडी गावामध्ये मंगवाडीच्या शेत शिवारामध्ये जाण्यासाठी मांगवाडी ते आगरवाडी हा पानंद रस्ता सुमारे 50 वर्षापासून लुप्तप्राय झालेला होता. शेतामध्ये जाण्याकरता या शिवारातील शेतकऱ्यांना रस्ताच नव्हता. पावसाळ्यामध्ये पाऊलवाटेने चिखल तुडवत शेतामध्ये जावे लागत असे पावसाळ्यात शेतीच्या मशागतीची साधने व बी  - बियाणे नेण्याकरता शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असे. या सर्व बाबी विचारात घेता मांगवाडी गावातील शेतकऱ्यांचे एक शिष्ट मंडळ 31 डिसेबर रोजी भेटले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारी 2025 रोजी तर प्रत्यक्ष रास्ता कामाची माडणीच झाली़निवेदन घेऊन विधान परिषदेच्या विद्यमान आमदार भावनाताई गवळी यांच्याकडे पोहोचले. शेतकऱ्यांच्या प्रश्नप्रति विशेष जिव्हाळा असणाऱ्या कृषी कन्या भावनाताई गवळी यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन  रिसोड च्या...

"खो-खो वर्ल्ड कप 2025 च्या प्रचारासाठी इचलकरंजीत भव्य रॅली"

Image
  "खो-खो वर्ल्ड कप 2025 च्या प्रचारासाठी इचलकरंजीत भव्य रॅली" ------------------------------------  कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------  13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान दिल्लीतील आय.जी. स्टेडियम येथे होणाऱ्या पहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर खो-खो असोसिएशनतर्फे इचलकरंजीत उत्साहात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले.   रॅलीची सुरुवात रा. छ. शाहू महाराज पुतळा येथून झाली आणि ती शिवतीर्थ, जनता चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे राजवाडा चौक येथे समाप्त झाली. या भव्य रॅलीत आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे  यांनी प्रमुख उपस्थिती लावून उपस्थितांना प्रोत्साहित केले.   आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, खो-खो वर्ल्ड कप हा भारतीय पारंपरिक क्रीडाप्रकाराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा उपक्रम आहे. खेळाडूंसाठी हे प्रेरणादायी पाऊल असून, क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांना व्यापक पाठिंबा मिळाला पाहिजे."   रॅलीत कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे प...

डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न!

Image
  डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान संपन्न! १६५४ श्रीसदस्यांच्या उपस्थितीत नवीन वर्षाच्या संकल्पातून स्वच्छतेचा जागर! १६५४ श्री सदस्यांनी स्वच्छता करून केले२०२५चे स्वागत ! २४७ पोती कचरा हददपार ! अमेरिका,कॅनडा,सिंगापुर,ऑस्ट्रेलियासह एकवीस देशात रस्ते,पार्क,बीच,नदी,हायवे दत्तक परिसरात स्वच्छता अभियान नियमित सूरू! प्रतिनिधी/ शेखर जाधव सातारा जावली .दि.01,समाजप्रबोधनासह समाजहितोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड येथील डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सौजन्याने महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी,डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी,श्री उमेशदादा धर्माधिकारी,श्री राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी कास धरण परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.१६५४ सदस्यांच्या उपस्थितीत महास्वच्छता अभियान संपन्न होऊन मोठयाप्रमाणावर जनजागृती होण्यास मदत झाली.        शहराच्या पश्चिमेस गेल्या दीड शतकापासुन साताऱ्याला शुद्ध पाण्याचा अखंड पुरवठा करणाऱ्या कास ...

स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास भविष्य आश्वासक – कुलगुरू माणिकराव साळुंखे.

Image
स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास भविष्य आश्वासक – कुलगुरू माणिकराव साळुंखे. ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन. *कोल्हापूर, दि. ०३ जानेवारी २०२५:* मानवी समाजातल्या   धर्मांमध्ये स्त्रियांप्रती भेदभाव केला आहे. त्यांना दुय्यम स्थान देऊन कमी लेखले आहे.पण ग्रंथानी त्यांना समानतेचा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे अधिकार अधिक विस्तारत गेले. स्त्रिया शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याने समाजाची पर्यायाने देशाची सर्वांगीण प्रगती होत आहे. आज ज्ञानाला अधिक महत्व प्राप्त झाल असून स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास त्यांचे भविष्य आश्वासक असेल, असे मत माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.  सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत कमला कॉलेज, कोल्हापूर येथे ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या प्रा.डॉ.प्रवीण घोडेस्वार लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्या माणिकराव साळुंखे बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक व जेष्ठ समीक्षक डॉ.रणधीर शिंदे, मुक्...

संघर्ष प्रतिष्ठान वाई तर्फे दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.

Image
  संघर्ष प्रतिष्ठान वाई तर्फे दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.  ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  दिनांक ०३-०१-२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री व वाई खंडाळा महाबळेश्वर चे जननायक आमदार मा.ना.मकरंद आबा पाटील (मदत व पुनर्वसन मंत्री) यांच्या हस्ते दिनदर्शिकाची प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर संघर्ष  प्रतिष्ठान चे  अध्यक्ष विशाल दादा मोरे, श्री.नितिन बापु भरगुडे- पाटील, श्री किरण दादा काळोखे श्री प्रदीप दादा जायगुडे, श्री श्रीकांत शेठ सावंत, श्री भुषण दादा गायकवाड, श्री लालु शेठ शिंगटे, श्री गोविंद काका इथापे, श्री राजु शेठ मोरे , श्री जाफर सय्यद, श्री काशिनाथ ( मामा )शेलार , श्री संतोष (पिंटू) काळे, श्री प्रणित फुले श्री अक्षय खाडे श्री प्रकाश ओतारी, श्री अजहर शेख हे सारे उपस्थित होते

नायगावातून क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन.

Image
  नायगावातून क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाईंना अभिवादन. ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  किसन वीर मधील एनएसएस व स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपक्रम; महाविद्यालयात अभिवादन वाई, ता. ३: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी नायगाव ते वाई क्रांतिज्योत आणून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. किसन वीरच्या एनएसएस विभागाने सावित्रीबाई फुले यांचा १९४ वा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयाची परंपरा अबाधित ठेवून नायगाव या सावित्रीबाईच्या जन्मगावातून वाईपर्यंत क्रांतिज्योत आणण्याचे ठरविले. हे नियोजन चालू असतानाच, पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही येण्याचा मानस व्यक्त केला. त्यास प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे यांनी पाठबळ दिले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, पोलिस भरतीचे प्रशिक्षक विशाल महांगडे यांनी नेटके नियोजन केले. या उपक्रमात डॉ. अ...

स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले_ प्रा. पुजा पाठक.

Image
  स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले_ प्रा. पुजा पाठक. ------------------------------------------- रिसोड प्रतिनिधी रणजीतसिंह.ठाकुर  ------------------------------------------- उत्तमचंद बगडिया कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रिसोड येथे एनएसएस,लैंगिक शोषण व रॅगिंग विरोधी समिती,मराठी विभाग आणि सांस्कृतिक समितीच्या वतीने तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अँड.शुभांगी मानमोठे तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. पुजा पाठक ह्या होत्या .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राध्यापक पाठक यांनी     स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेंढ रोवली व आज त्यांच्यामूळे आज अनेक क्षेत्रात स्रीया पुरुषांच्या बरोबरीने कार्य करून सन्मानाने जगता आहेत असे म्हटले तर अँड.शुभांगी मानमोठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाईंचे कार्य अफाट आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले त्याचप्रमाणे केशवपण प्रथा बंद केली सत्यशोधक समाजाचे कार्य पती निधनानंतर समर्थपणे चालवले प्रास्ताविक प्रा.डॉ. एम पी खेडेकर ...

रिसोड येथे नव-वर्षाचे स्वागत वृक्षारोपणाणे.

Image
  रिसोड येथे नव-वर्षाचे स्वागत वृक्षारोपणाणे. ----------------------------------  रिसोड प्रतिनिधी रणजित सिह. ठाकुर  ----------------------------------   प्रत्येक नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या जवळचे मित्रगण तसेच नातेवाईक एकमेकांना "नविन वर्ष सुख,समाधान व भरभराटीचे जावो" अश्या प्रकारच्या शुभेच्छांचा वर्षाव करित असतात.ह्या आपुलकीच्या शुभेच्छांचा जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.पण खरचं, फक्त शुभेच्छांच्या वर्षावाने माणसाची भरभराट होते का? तर हे शक्य नाही.भरभराटीसाठी तसेच मनशांतीसाठी प्रत्येकालाच कोणते तरी विधायक कार्यच करावे लागेल.असे मत प्राचार्य गजानन मुलंगे ह्यांनी लोणी रोड तसेच गणेशपुर चौक येथे आयोजित नव- वर्ष्यानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता विष्णु जटाळे वनपाल,निर्मला दिघोळे वनपाल,रमेश कदम वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग वाशिम परिक्षेत्र रिसोड,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मदन चौधरी,अध्यापक गुणवंत थोरात,वृक्षमित्र नवनाथ खैरे,वर्षा देशमुख पर्यवेक्षिका, प्राध्यापिका शुभांगी चवरे,प्राध्यापिका वंदना सरनाईक, अध्यापिका राखी मोरे श्री शिव...

प्लास्टिक चहाच्या कपावर बंदी आणण्यासाठी पत विक्रेता सदस्याच्या वतीने निवेदन.

Image
  प्लास्टिक चहाच्या कपावर बंदी आणण्यासाठी पत विक्रेता सदस्याच्या वतीने निवेदन. ----------------------------------   रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर                ----------------------------------     प्लॅस्टिक चहाच्या कपावर कायमची बंदी आणावी या मागणीसाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा यांना पत विक्रेता सदस्याच्या वतीने 3 जानेवारीला निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, सर्वत्र प्लास्टिक कागदी कपाचा  वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, प्लॅस्टिकचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामक केमिकलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो  त्यामुळे त्या प्लॅस्टिकच्या कपात गरम चहा किंवा गरम पाणी टाकल्यास कपाच्या आतील भाग वितळतो आणि अशा कपातून चहा घेतल्यास लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात आणि कॅन्सर सारखा दुर्धर आजार होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे प्लास्टिक कागदी कपावर तात्काळ बंदी आणून प्लास्टिक कागदी कप विकणारे व हॉटेलमध्ये वापर करणाऱ्या दुकान मालकावर योग्य ती कारवा...

थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ.

Image
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई. मुंबई, दिनांक १ जानेवारी, २०२५- बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  मा. लोकेश चंद्र यांनी केले. राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून अभय योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा कालावधी ३० नोव्हेंबर रोजी संपल्या नंतर ३१ डिसेंबर पर्यंत एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु राज्यातील ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्ष्यात घेऊन ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत चालू  ठेवण्याचा निर्...

सावित्रीमाई: कणकणातून ज्ञान वेचणारी!.

Image
  सावित्रीमाई: कणकणातून ज्ञान वेचणारी!. सावित्रीमाई फुले जयंती व महिला मुक्ती दिन विशेष.       सावित्रीमाई फुले यांचा जन्म आजच्या दिवशी म्हणजेच दि.३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे- पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीमाईंची जयंती महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीमाईंना महात्मा जोतिरावजी फुलेंनी शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आज सावित्रींच्या लेकी जगात सर्वत्र सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. याची सुरुवात सावित्रीमाईंमुळे झालेली आहे. कारण त्यांनी शिक्षणमंत्रच आपल्या काव्यसंग्रह- काव्यफुलेमधून दिला-       "विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून।       तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानती जन॥"       म.जोतिरावजी फुलेंचे मूळ आडनाव गोरे होते. पण पेशव्यांनी त्यांचे वडील गोविंदराव फुले यांना पुण्यातल्या फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून त्यांचे कुटुंब पुण्यात आले. त्यांच्या फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे आडनाव फुले असे पडले. जोतिरावांचा स...

वाचनाने माणसाची स्मरणशक्ती व वैचारिक प्रगल्भता सुधारते : डॉ. जयवंत चौधरी.

Image
  वाचनाने माणसाची स्मरणशक्ती व वैचारिक प्रगल्भता सुधारते : डॉ. जयवंत चौधरी. ----------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ----------------------------------  वाई: ०१/०१/२०२४ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि कृष्णाली बुक वर्ल्ड सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या अभियानाअंतर्गत वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी “पुस्तक प्रदर्शन – २०२५” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सदर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांच्या हस्ते झाले. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. चौधरी म्हणाले, आजचे पुस्तक प्रदर्शन वाचकासाठी खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. शिक्षकांच्या अध्ययन आणि अध्यापन या प्रक्रियेतील महत्वाचा घटक म्हणजे वाचन. शिक्षकांनी वाचन वाढवले तर त्यांचे अध्यापन अधिक परिणामकारक होईल त्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकांचा संदर्भ घ्यावा. वाचनाने माणसाची स्मरणशक्ती सुधारते, त्याचबरोबर वैचारिक प्रगल्भता देखील वाढते. म...

दुर्गेवाडी येथील योगेश घोलप यांचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू.

Image
  दुर्गेवाडी येथील योगेश घोलप यांचा मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू. ------------------------------------  कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------  दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील योगेश तुलसीराम घोलप वसाहत नंबर १ या युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला, सदर घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककळा पसरली असून योगेश मुंबई येथे प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करत होता.  रेल्वेतून प्रवास करत असताना डांबाला धडकल्याने योगेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. योगेशचे पार्थिव देह आज रात्री उशिरा दुर्गेवाडी येथे दाखल होणार असल्याची माहिती सरपंच सचिन घोलप यांनी दिली आहे.

मस्साजोग सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधारासह संशयित आरोपीना तात्काळ अटक करा, सरपंच परिषदेचे हातकणंगले तहसीलदाराना निवेदन.

Image
  मस्साजोग सरपंच देशमुख हत्याप्रकरणी सूत्रधारासह संशयित आरोपीना तात्काळ अटक करा, सरपंच परिषदेचे हातकणंगले तहसीलदाराना निवेदन. ------------------------------------  कुंभोज प्रतिनिधी   विनोद शिंगे ------------------------------------            मस्साजोग ता. केज जि.बीड येथील युवक सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली, समाज कंटकानी अपहरण करून त्यांची क्रूर व अमानुषपणे हत्या करून माणुसकीला काळीमा फासला आहे. लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची हत्या बीड जिल्ह्यात फोफावलेल्या राजकीय गुंडगिरीतून झाली आहे.         खून प्रकरणातील संशयित आरोपीचा पोलीस तपास करून तात्काळ अटक न झाल्यामुळे राजआश्रया खाली मोकाटपणे फिरत आहेत. सरपंच परिषदेचे राज्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच यांच्यामध्ये शासन, पोलीस प्रशासन व पोलीस तपास बाबत असंतोषाचा प्रचंड भडका उडाला आहे.         सरपंच देशमुख हत्याकांड प्रकरणी सरपंच परिषद, मुंबईने संपूर्ण राज्यभर जिल्हास्तरावर गुन्हा तपास व अट...

भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी...... विष्णुपंत भुतेकर

Image
  भूमिपुत्रचा लढा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी...... विष्णुपंत भुतेकर. ----------------------------------     रिसोड प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------                भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सहाव्या  वर्धापन दिनानिमित्त काल एक जानेवारीला जिल्ह्यातील तथा जिल्हा बाहेरील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत  भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून वाशिम येथील जिल्हा कार्यालयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा लढा   शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकरी सन्मानासाठी कायम चालू राहील याची ग्वाही दिली.       भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत मिळावी म्हणून एक लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या सहया गेल्या सोळा डिसेंबर पासून आज पर्य...

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ. महाविद्यालयात येवता शाळेमध्ये महंत शांतीपुरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना ब्लेंकेट वितरण"

Image
 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ. महाविद्यालयात येवता शाळेमध्ये महंत शांतीपुरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना ब्लेंकेट वितरण"  ------------------------------ रिसोड  प्रतिनिधी  रणजीत सिंह ठाकुर  ------------------------------ दिनांक ०१/०१/२०२५  ला शिवाजी विद्यालय येवता येथे स्थानिक शाळा समिती अध्यक्ष महंत शांतीपुरी महाराज यांचा वाढदिवस मोठ्या हर्षउल्हासात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष  श्री शिवाजी  शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री लाव्हरे सर होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथिल दानशुर कुटुंब दिघे परिवारातील सदस्य व शाळा समिती या सर्वांची उपस्थिती होती. सर्वप्रथम  आपल्या प्रास्ताविक अभिभाषणामध्ये शाळेचे प्राचार्य मा. विजयकुमार ढेंगळे सर  यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता  शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात,  याबद्दल उपस्थित पालकांना माहिती दिली.तसेच नाशिक येथील दानशुर कुटुंब राबवित असलेल्या कुटुंबाचे आभार मानले. आपल्या प्रमुख  भाषणामध्ये माननीय लाव्हरे सर यांनी शाळेत होत असले...

बगडिया महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा.

Image
  बगडिया महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळा. ----------------------------------   रिसोड प्रतिनिधी.  रणजीत सिंह ठाकुर  ----------------------------------  उत्तमचंद बगडिया कला  वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात1 जानेवारी 2025 ला वाचन पंधरवाडा निमित्त वाचन कौशल्य कार्यशाळेचे तसेच सामूहिक वाचन या उपक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाद्वारे करण्यात आले. प्रस्तुत कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . विनोद कुलकर्णी यांनी  दीप प्रज्वलित करून केले.प्राचार्य डॉ . विनोद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती ही विद्यार्थी जीवनात कसे आमुलाग्र बदल घडवून आणू शकते याचे विविध दाखले सउदाहरण देऊन वाचनाकरिता प्रेरित केले व वाचन पंधरवाडा हा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच साजरा करावयाच्या असल्यामुळे नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये रोज वाचन करणार असा संकल्प विद्यार्थ्यांकडून वदवून घेतला व तो पूर्णत्वास जाईल असा आशावाद व्यक्त केला. वाचन कौशल्य कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्रा . एस व्ही टीकार यांनी कोणती पुस्तकं वाचावी व कशी वाचावी याबद्दल मार्गदर्शन केले.वाचन क...

कोरेगावमध्ये छोटा गंधर्व नाट्यगृह झाले पाहिजे.

Image
  कोरेगावमध्ये छोटा गंधर्व नाट्यगृह झाले पाहिजे. ---------------------------- सातारा : प्रतिनिधी  ---------------------------- कण्हेर (गणेशनगर),ता. सातारा येथील सुनील बाबुराव वाघमळे यांना छोटा बालगंधर्व स्मृती पुरस्कार कोरेगाव येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.       कोरेगाव येथील छोटा गंधर्व प्रतिष्ठान व पुणे येथील बालगंधर्व संगीत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरराज छोटा गंधर्व स्मृतिदिनानिमित्त सुनील वाघमाळे यांच्यासह रुपचंद चव्हाण,श्रीकांत गिरगाव,रोहन पवार व स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार केदार केळकर यांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.तेव्हा वर्षभरात नाट्यगृह होण्याबाबत अनेकांनी भाष्य केले.          कल्याणी व बकुळाताईंनी गायन केलेल्यासंगीत मैफिलीचा मनमुराद आनंद श्रोत्यांनी घेतला.यावेळी वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष मदन महाराज कदम,शिवचरित्र व्याख्याते आझाद महाराज गुजर,पंडित व्यास,श्रीकांत कात्रे,डॉ.सच्चिनांद,प्रवीण जाधव,बापूजी साळुंखे, मुख्याध्यापक विश्वेश्वर तथा अतुल आमंदे,अवधूत आमंद...

बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 461 जनावर कारवाई लातूर पोलिसांची कामगिरी.

Image
बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या 461 जनावर कारवाई लातूर पोलिसांची कामगिरी. --------------------------- लातूर/ प्रतिनिधी  --------------------------- 55 मद्यपी वाहन चालकावर गुन्हे दाखल, तर अतिवेगाने, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या एकूण 461 वाहचालकांवर लातूर पोलिसांची कारवाई. 03 लाख 41 हजार रुपयांचा दंड वसूल.*                  नववर्षाचे सेलिब्रेशन करताना दारू पिऊन वाहन चालवणार्‍या चालकांविरुद्ध लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लातूर जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईत 55 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. तसेच अतिवेगाने वाहन चालविणे, भर रस्त्यात वाहन लावणे, बेदरकारपणे हयगयीने वाहन चालवून दुसऱ्याचे जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या 461 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करून 03 लाख 41 हजार 200 रुपये इतका दंड वसूल केला आहे.               नववर्षाचे स्वागत करीत असताना काही अतिउत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून शांतता भंग करतात. मद्यपान करून वाहन चालविल...

शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांकच्या वतीनेडॉ. आंबेडकर यांना अभिवादन.

Image
  शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला अल्पसंख्यांकच्या वतीनेडॉ.  आंबेडकर यांना अभिवादन. -------------------------------- पुणे/ प्रतिनिधी  -------------------------------- 1927 रोजी भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले होते यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी  सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचा गौरव केला होता. आज शौर्य दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे शहर महिला अल्पसंख्यांकच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुणे शहर महिला अल्पसंख्यांक अध्यक्ष नूरजहा शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,  यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, दत्ता सागरे, वर्षाताई आठल्ये, अविनाश येनपुरे, रघुनाथ भिसे, सुरेखा कांबळे, आदि यावेळी उपस्थित होते

दारू नको,दूध प्या ! अंनिसचा अनोखा उपक्रम संपन्न !!अनिल वीर.

Image
  दारू नको,दूध प्या ! अंनिसचा अनोखा उपक्रम संपन्न !!अनिल वीर. सातारा : येथील महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती व परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दारू नको दूध प्या ! असा अनोखा उपक्रम संपन्न झाला.    गेली सतत 20 वर्षाहून अधिक पासून वर्षाअखेरीस व्यसन विरोधी ।मोहीम राबवून शाळा कॉलेजमध्ये प्रबोधन करून   शहराचे केंद्रस्थानी गोळबाग, राजवाडा येथे कार्यक्रमात,नो चेअर नो बियर,ओन्ली हॅपी न्यू इयर,दारू नको दूध प्या,व्यसनात रंगला,संसार भंगला आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.उपस्थितांना दूध वाटप करण्यात आले.यावेळी वारकरी परंपरेचे गायकवाड व  त्यांचे सहकारी ,परिवर्तचे बंधुत्व पुरस्कार विजेते उदय चव्हाण व त्यांचे सहकारी,अंनिसचे पदाधिकारी वंदना माने, प्रशांत पोतदार,भगवान रणदिवे, डॉ.दिपक माने,प्रकाश खटावकर,दशरथ रणदिवे,ऍड. हौसेराव धुमाळ,विजय पवार, वर्षा पवार,प्रा.दत्तात्रय जाधव, श्रीनिवास जांभळे आणि विविध क्षेत्रातील नागरिक,पत्रकार, मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. फोटो : दूध वाटप करताना उदय चव्हाण शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)

वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वर्षाप्रारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न.

Image
  वृक्ष संवर्धनाचा कार्यक्रम वर्षाप्रारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न. सातारा : हरित सातारा यांच्यावतीने येथील मंगळाई वृक्ष संवर्धन या उपक्रमाच्या दुस-या पर्वाचा प्रारंभही नव्या वर्षारंभीच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.     यावेळी राजेश पुरोहित, श्री.व सौ. डॉ.अमृता श्रेयस मिसाळकर, अंकुश चाळके,बाळासाहेब गौताड, प्रकाश खटावकर,गॉड गिफ्टचे रणदिवे, उमेश खंडझोडे, सौ.व श्री.विसापुरे, अनिल वीर, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, शहरातील कॉलेजचे प्राध्यापक,एनसीसीचे अध्यानार्थी असे शेकडो वृक्षप्रेमी उपस्थीत होते. सरतेशेवटी अल्पोपहार व चहापानाने सांगता करण्यात आली.             सूर्यनारायनाच्या साक्षीने  विविध संस्था, संघटना, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ यांच्या सहकार्यातून दर शनिवारी झाडांना पाणी देऊन ती जगवण्याचा उपक्रम सुरू राहणार आहे.  फोटो : वृक्षास पाणी घालताना पुरोहित शेजारी रणदिवे,वीर व एनसीसी विद्यार्थी.