जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न.
जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयांचा क्रीडामहोत्सव उत्साहात संपन्न.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई : जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर माध्यमिक विद्यालयांच्या ७ शाखांमधील विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारांतील विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धांची सुरूवात दीपप्रज्वलन व संस्था ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन संस्था सचिव डॉ. जयवंत चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. उदघाटनप्रसंगी डॉ. चौधरी यांनी स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या, डॉ. चौधरी म्हणाले, खेळांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक व व्यक्तिमत्व विकास होतो. विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी खेळाडूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.
यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे व पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी संस्थाध्यक्ष श्री. मदनदादा भोसले म्हणाले, खेळामुळे निर्णयक्षमता, शिस्त, सहानुभूती आणि सहकार्याची भावना विकसित होते. गुणवत्तेच्या बळावर व्यक्ती जीवनात कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो. माध्यमिक स्तरावर विकसित गुणवत्तेचा उपयोग महाविद्यालयीन जीवनात उज्ज्वल यश संपादन करण्यात होतो. बक्षिस मिळविणाऱ्या व सहभागी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. श्री. सुनिल जाधव माजी मुख्याध्यापक यांनी विजेतेपदाची ट्रॉपी पुरस्कृत केली.
सदर स्पर्धेत विविध खेळ प्रकारात विजेतेपद अरविंद पवार (पाटील) माध्यमिक विद्यालय वेळे व उपविजेतेपद माध्यमिक विद्यालय खानापूर यांनी मिळविले.
बक्षिस वितरण समारंभाचे प्रास्ताविक सौ . शालन जाधव ( मुख्याध्यापिका शिरगाव ) यांनी केले, पाहुण्यांचा परिचय श्री. सुनिल शेलार (मुख्याध्यापक धावडी ) यांनी करून दिला. सूत्रसंचालन श्री. राजेंद्र भोसले (वेळे) , गणपत जाधव ( व्याजवाडी )तर आभार श्री. निखिल भोसले (मुख्याध्यापक, गोवेदिगर ) यांनी मानले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निमंत्रक श्री. संजय वाईकर (मुख्याध्यापक माध्य विद्यालय खानापूर ), सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment