शिरोली एमआयडीसी नागाव परिसरात एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या.
शिरोली एमआयडीसी नागाव परिसरात एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या.
--------------------------------
शिरोली प्रतिनिधी
अमित खांडेकर
--------------------------------
सोमवारी पहाटे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सुमारे दहा लाखाची रोख रक्कम चोरीला गेली आहे.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की शिरोली पुलाची येथील कोल्हापूर सांगली रोडवर जैन धर्मियांचे मोठे धर्मस्थळ असलेले जैन मंदिरात पहाटे 4 च्या सुमारास मागील बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिराच्या कार्यालयातील तिजोरी फोडून सुमारे 7 लाखापर्यंतची रोकड लंपास केली आहे.ही तिजोरी फोडण्यासाठी मोठा दगड व कटवणीचा वापर करण्यात आला
त्याचबरोबर या मंदिराच्या शेजारी असणारे प्रसिद्ध भांड्याचे दुकान फोडून तेथील रोख रक्कम चोरली आहे.
तसेच नागाव फाटा नजीक मेनन कॉलनी मध्ये तीन भाडेकरूंचे दरवाजे फोडून रोख रक्कम व किरकोळ दागिने लंपास केले आहेत. एकाच रात्री तीन चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हाहन दिले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Comments
Post a Comment