बाळूमामा देवालय आदमापूर देवस्थानला "अ" वर्ग दर्जा दया.
बाळूमामा देवालय आदमापूर देवस्थानला "अ" वर्ग दर्जा दया.
------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
------------------------------
आदमापूर ग्रामपंचायतीने विधान परिषद सभापती श्रीराम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
श्री. बाळूमामा देवालय आदमापूर देवस्थानला "अ" वर्ग दर्जा देऊन आदमापूर ग्रामपंचायतीस भक्तांच्या सोयी सुविधांसाठी वार्षिक एक कोटी विशेष निधीची तरतूद करावी आदमापूर ग्रामपंचायत यांनी विधान परिषद सभापती श्रीराम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नुकतीच विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आदमापुर दौरा केला होता या दौऱ्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायत वतीने आदमापूर देवस्थानाला अ दर्जा मिळावा तसेच भक्तांच्या सोयी सोयीसाठी ग्रामपंचायत तिला वार्षिक एक कोटी विशेष निधीची तरतूद करून मिळावी असे निवेदन दिले निवेदनामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे दर अमावस्येला देवगड निपाणी राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था कोलमडते त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा निघावा तसेच एकेरी वाहतूक मार्ग पोलीस चौकी व वाहतूक पोलीस नेमणूक करण्यात यावी, मरगुबाई मंदिर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत इमारत तसेच आदमापुर मधील रस्ते गटर्स गावांमधील बायपास रस्ते यांसाठी वार्षिक निधी मंजूर करून हा कर्ज शासनामार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी सरपंच विजय गुरव सागर पाटील अनिल पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment