शाहुपुरी पोलिसांनी केली दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक.

 शाहुपुरी पोलिसांनी केली दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक.


दिनांक १६/१२/२०२४ रोजी दोन इसम मार्केट यार्ड येथे एक चोरीची मोटारसायकल विक्री करणे करीत येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाणे कडील विकास चौगुले व सनिराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फात मिळाली मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचे मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाणे कडील सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, रवी आंबेकर,महेश पाटील, सुशील गायकवाड यांनी आकाश पान शॉप मार्केट यार्ड येथे सापळा रचला असता सायंकाळी ०६.३० वा आकाश पान शॉप येथे दोन इसम एका मोटारसायकल वरून येताना दिसले बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार दोन इसमाचे  वर्णन जुळत असल्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करून त्यांना थोड्या अंतरावर  पकडले  त्यांचे नाव व गाडीच्या कागदपत्रा बाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अमित श्रीराम विश्वकर्मा वय ३५ रा. लेटस ग्रुप, उचगाव कोल्हापूर २) सूर्याजी मारुती जाधव वय ५९ रा. घोडके चाळ, टेंबलाई नाका, रेल्वे फाटक कोल्हापूर. असे सांगून त्यांनी भवानी मंडप पार्किंग सीबीएस कोल्हापूर अयोध्या हॉटेल कोल्हापूर येथून मोटरसायकली चोरल्याची  कबुली दिली. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील मोटार सायकली जप्त केल्या व त्या शाहुपुरी पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पुढील तपास महिला पोलीस हवालदार अश्विनी काळे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.