तारदाळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मृत्युंजय पाटील यांची निवड.
तारदाळ ग्रामपंचायत उपसरपंच पदी मृत्युंजय पाटील यांची निवड.
-----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------------
तारदाळ ग्रामपंचायत उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने मृत्युंजय पाटील यांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पल्लवी पवार होत्या, निवडीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी कुमार वंजीरे, भाऊसो चौगुले विनायक वडर यांनी पाहिले तारदाळ ग्रामपंचायत येथील माजी उपसरपंच प्रवीण पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी मृत्युंजय महादेव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता दुपारी दोन पर्यंत कोणत्याही अन्य उमेदवाराने अर्ज दाखल ने केल्याने मृत्युंजय पाटील यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला त्यामुळे उपसरपंच पदासाठी मृत्युंजय पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच पल्लवी पवार यांनी जाहीर केले सदरच्या निवडीनंतर मृत्युंजय पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे उपस्थित होते. विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment