वळीवडे येथे बेकायदेशीर आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी आठ बांधकाम धारकावर गुन्हा दाखल.

वळीवडे येथे बेकायदेशीर आणि विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी आठ  बांधकाम धारकावर गुन्हा दाखल.

------------------------- 
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------- 

गांधीनगर :- महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागाची परवानगी न घेता विनापरवाना आणि बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरण गुलाब जयगोपाल निरंकारी (वय 42), सुंदर बखतराय निरंकारी (वय66)रा. निरंकारी कॉलनी, वळीवडे, श्रीमती मोहिनी हसानंद रोहरा (वय 61) रा. सृष्टी अपार्टमेंट वळीवडे, ता.करवीर, श्रीमती वर्षा दीपक सचदेव रा . म्हसोबा मंदिर रोड वळीवडे , मोहिदीनकुटी मोहम्मद थोटेकाडन (वय 45), समीर मोहम्मद थोटेकाडन (वय 39)रा. इचलकरंजी , राहुल विजयकुमार तलरेजा,(वय33)रा . बाशाराम पार्क गांधीनगर, संजना रमेश वाछानी रा . गांधीनगर,या बांधकाम धारकावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . याबाबतची फिर्याद नगर रचनाकार गुलाबराव हंबीरराव झांबरे (वय 55)रा. महाडिक वसाहत कोल्हापूर यांनी दिली.


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी वळीवडे  ता करवीर गावच्या हद्दीत गट क्रमांक 146/4/1 ,रि.स.186/3/1,215/ब, या जागेवर नगर रचना विभागाची परवानगी न घेता अनाधिकृत रित्या बांधकाम सुरू ठेवले आहे. त्याचा पंचनामा शासकीय अधिकाऱ्यांनी करून  अधिनियम 1966 तरतुदी मधील कलम 52,54,(2) कलम 43 या कायद्याचा भंग करून बांधकाम सुरू ठेवले आहे या कारणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात आठ बांधकाम धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.