माजी विद्यार्थ्यांचे रंगले रोप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन.
माजी विद्यार्थ्यांचे रंगले रोप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन.
------------------------------
नांदेड़ प्रतिनिधि
------------------------------
नांदेड : माधवराव पाटील माध्यमिक शाळा व कमला नेहरू कन्या शाळा एसएससी बॅच 1999-2000 चा रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा 15 डिसेंबर 2024 रोजी नांदेड येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेला भेट देऊन झाली, यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले वर्ग, खेळाचे मैदान पाहून विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील दिवस पुन्हा जिवंत झाल्याचा अनुभव घेतला व
नैवेद्यम बँक्वेट हॉल येथे हा स्नेहामिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांवर पुष्पवर्षाव करून झाली. या निमित्ताने उपस्थित माजी मुख्याध्यापक राठोड , मुखध्यापक एडके आणि मुख्याध्यापिका श्रीमती बच्चेवर व इतर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना पाहून व हितगुज करून जुन्या आठवणींना उजाळा दिला .यावेळी जुन्या नव्या आठवणींना उधान आले होते.
याचवेळी स्नेहमेळाव्यात विविध मनोरंजक कार्यक्रम, संवाद आणि प्रेरणादायी भाषणांनी वातावरण आनंददायी झाले. विद्यार्थ्यांनी शाळेचे महत्व व त्याचा आपल्या आयुष्यातील योगदाना विषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचं उत्तम आयोजन आणि सर्वांचा सहभाग त्यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला म्हणून संपूर्ण आयोजक मंडळाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment