भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने स्त्रिमुक्तीदिन.

 भारतीय बौद्ध महासभेच्या  वतिने  स्त्रिमुक्तीदिन.

---------------------------------

 रिसोड. प्रतिनीधी

रणजितसिह. ठाकुर 

----------------------------------

 रिसोड: भारतीय बौद्ध रिसोड  शाखेच्या  वतिने आज स्त्रिमुक्तीदिनानिमीत  कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात  आले  होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा संध्याताई पंडित   तर प्रमुख  मार्गदर्शिका  मेघाताई डोंगरे होत्या .प्रथम  तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्ति व प्रतिमांना  पुष्प व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी  मुलींनी त्रिशरण  पंचशील  घेतले.  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक  देविदास  सोनुने  यांनी  केले.   मेघाताई डोंगरे यांनी  बोलताना सांगितले  कि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती   या स्त्रियासाठी जाचक  नियम  असलेल्या  ग्रंथांचे दहन  करून  खऱ्या  अर्थाने स्त्रिला  धार्मिक  गुलामीच्या  बंधनातून  मुक्त  केले. म्हणून  महिला ह्या  प्रत्येक  क्षेत्रात  अग्रेसर  आहेत. 

 आणि महिलांनी स्वनिर्णय  घ्यावेत  तर खऱ्या  अर्थाने महिला  मुक्त  होईल. या  कार्यक्रमात  प्रमिलाताई  शेवाळे,  कल्पनाताई राऊत  जी.प.सदस्या ,ॲड.मिराताई इंगळे. सुष्मिता मोरे मॅडम, प्रा. रंगनाथ  धांडे. प्रचार्य  डाॅ.विजय  तुरुकमाने  या सर्वांनी  इतर  धर्मात, देशात  स्त्रियावरिल बंधना  विषयी  माहिती सांगितली.पण बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळुन  संविधानाच्या  माध्यमातून  स्त्रियांना  समान  हक्क  दिलेत असे सांगितले. 

कार्यक्रमात  उपस्थित  मंदाताई  धांडे, मीनाताई चव्हाण, संगिता  पडघान,  जिजाताई कळासरे,सीमा  धांडे, इंदुताई  तुरुकमाने, कांताबाई मोरे,वंदनाताई  मोरे ,  मालताताई जावळे ,   पडघान  आई,अंभोरे  आई, त्रिवेणीताई जुमडे,  खैरे  ताई, गोपाल  पारिसकर, नासेन धांडे,  व बहुसंख्येने  महिला  .बालिका  उपस्थित  होते. 

 कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन  दीक्षा  कंळबे तर आभार  शालिग्राम पठाडे  यांनी  मानले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.