कला महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा.

 कला महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा.

----------------------------

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

----------------------------

कोवाड (ता.चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. महाविद्याल्याच्या प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ.ए.के.कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व सांगून त्यांचे विचार समाजाला किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय सैन्य दलात भरती झालेला महाविद्यालयाचा इतिहास विभागाचा विद्यार्थी कु.केतन कृष्णा पाटील  याचा प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इतिहास विभाग प्रमुख डॉ.व्ही.आर.पाटील  यांनीही त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्याशाखेतील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रास्तविक डॉ.दीपक पाटील यांनी केले. आभार प्रा.संदीप पाटील यांनी मांडले

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.