“नि:स्वार्थ सेवाभाव, हा स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचा स्थायीभाव होता.

 “नि:स्वार्थ सेवाभाव, हा स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचा स्थायीभाव होता.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

 श्री. विजय वाघ

वाई : दि.१९/११/२०२४ "स्व. भांऊ आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात समाजाच्या प्रगतीसाठी नि:स्वार्थ भावनेने झटत राहिले परंतु त्या मोबदल्यात स्वतःसाठी किंवा आपल्या कुंटुंबासाठी काहिही मागीतले नाही. निःस्वार्थ सेवाभावी वृत्ती ठेवून; अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी आपला देह झिजवला. असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात होणे नाही.  हजरजबाबी, सतत आनंदी, निटनेटकेपणा, तीक्ष्ण नजर व पारदर्शी कारभार असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते.  भाऊंना शेती विषयी प्रचंड आवड आणि आस्था होती. शास्त्रीय संगीताची, विशेष करुन मराठी, हिंदी, उर्दु गजल कवितांची आवड असल्याने ते एक उत्तम रसिकही होते." असे प्रतिपादन श्री. विजय वाघ यांनी केले.

येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या सातव्या मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भिमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रमेश डुबल, माजी प्र. प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, श्री. गणेश चव्हाण, अॅड. प्रतापराव पिसाळ हे मान्यवर उपस्थित होते. 

                   श्री. वाघ पुढे म्हणाले की, ”भाऊंना शेतीविषयक प्रंचड ज्ञान होते. म्हणून राष्ट्रीय पातळीवर किसान जागरण मंचाची स्थापना करून; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शंभरावर सभा घेवून देशातील शेतकऱ्यांसमोर जागर केला. स्व. भाऊ हे एक चालतं बोलतं विद्यापीठ होते.  वाई आणि खंडाळा या परिसरातील अनेक रस्त्याची कामे स्वतः पुढाकार घेवून भाऊंनी पूर्ण केली आहेत. म्हणूनच आज लालपरी या परिसरातील खेडेगावामध्ये जाते. आंधळी, कन्हेर, धोम ही धरणे भाऊंच्या कारकिर्दित वेळेत पूर्ण झाली आहेत. किसन वीर सहकारी साखर कारखाना तसेच खंडाळा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या उभारणीत  तसेच जनता शिक्षण संस्थेच्या, किसन वीर महाविद्यालयाच्या उभारणीत भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. सार्वजनिक जीवनात भाऊं नेहमी काटेकोरपणे वागत .  समाजापरी कृतज्ञतेची भावना भाऊंनी कायम ठेवली." 

आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “स्व.भाऊंचं व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते. विद्यापीठात ज्याप्रमाणे विविध विद्याशाखांमधून विविध विषयांचे ज्ञान घेता येते त्याप्रमाणे आदरणीय भाऊंच्या जीवनानुभवातून विविधांगी आदर्श विचार घेता येण्यासारखे आहेत. भाऊंच्या व्यक्तिमत्वात अनेक आदर्श गुण होते. त्यांनी सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यालाही सन्मानपूर्वक वागणूक दिली. स्वतःच्या जीवनामधून जो आदर्श समाजासमोर ठेवला आहे, त्यामधून आपणाला खूप काही घेण्यासारखं आहे. भाऊंचे आदर्श विचार पुढे घेवून जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. म्हणून त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या व्याख्यानमालेच आयोजन केलेल आहे आणि ते सार्थक होईल अशी मला आशा आहे.”

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.