लोह्यात श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

 लोह्यात श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

-----------------------------------

लोहा प्रतिनिधी

अंबादास पवार

-----------------------------------

लोह्यातील भव्य रक्तदान शिबीरात तब्बल १०० रक्दांत्यानी केले रक्तदान.

       स्वानंद सुखनिवासी,वेदांत केसरी,ब्रह्मीभूत श्री संत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नगरेश्वर मंदिर लोहा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन काल  दि.१९ सप्टेबर रोजी करण्यात आले होते.सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्त दान शिबिर घेण्यात आले. तत्पूर्वी प्रथमत; हभप सखाराम महाराज व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

       यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार,नगरेश्वर मंदिर लोहाचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार व समस्त आर्य वैश्य युथ आदींच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.सदरील रक्तदान शिबिरात तब्बल १०० रक्त दांत्यानी रक्तदान केले.

        भव्य रक्तदान शिबिराचे आयोजक शंकर सावकार वट्टमवार,राजेश कोटलवार,राहुल  कोंडावार,प्रविण  अंकूलवार,अमोल  मोटरवार,

वसंत उत्तरवार, सोमनाथ  पालिमकर,अदित्य  बिडवई,ऋषिकेश  तेललवार, 

गौरव  दमकोंडवार,संकेत  मोतेवार,उमेश  बिडवई,गजानन  कटकमवार, भुषण दमकोंडवार,व 

सर्व आर्य वैश्य समाज बांधवांनी भरपूर परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.