किसन वीर’ च्या स्वयंसेवकांनी केले ग्रामसर्वेक्षण.

 किसन वीर’ च्या स्वयंसेवकांनी केले ग्रामसर्वेक्षण.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

भिलार, भोसे, गुरेघर येथे केली घनकचराविषयक जागृती

वाई : दि. २१ डिसेंबर

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी भिलार, भोसे व गुरेघर येथील घराघरात जाऊन  घनकचराविषयक जागृती केली. 

सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन यांची संकल्पना, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांचे पाठबळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे व महाबळेश्वर तालुक्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे समन्वयक अजय राऊत याचे मार्गदर्शन यानुसार या ग्राम सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी  डॉ. संग्राम थोरात यांनी त्याचे नेटके नियोजन केले. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषद सातारा जिल्हा, पाणी व स्वच्छता मिशन विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वेक्षणात स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

ग्रामस्थांनी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करावा, तो रस्त्यावर न टाकता घंटागाडीत टाकावा असा स्वच्छतेचा संदेश स्वयंसेवकांनी घराघरात जाऊन दिला.  प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरण संतुलन बिघडते, जमीन नापीक होते असाही पर्यावरणपूरक संदेश त्यांनी दिला. प्लास्टिकच्या कपातून चहा घेणे, पत्रावळीतून जेवण करणे हे कॅन्सरसारख्या आजाराला आमंत्रण असल्याचेही त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. एस. एसचे सल्लागार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, नितीन बाळासाहेब भिलारे, जितेंद्र चव्हाण, डॉ . सकट, तिन्ही गावचे सरपंच, सदस्य, कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

या सर्वेक्षणात समीक्षा शेलार, साक्षी यादव, ईश्वरी पोळ,  साक्षी नरुटे, सृष्टी जोशी, साक्षी शिंदे, श्रावणी जाधव, पूजा भाणसे, स्वीटी नरवाडे, रितेश सणस, सुमित  भणगे, हर्षल वाडकर, चेतन गुरव, शुभम जाधव, आयुष लोखंडे यांनी भाग घेतला.

किसन वीर महाविद्यालय, वाई हे असे सर्वेक्षण करणारे पहिले महाविद्यालय असल्याचे याशनी नागराजन यांनी सांगितले. राजेश जाधव यांनी पुस्तकाच्या गावाच्या संकल्पनेची माहिती दिली. २१ डिसेंबर या जागतिक ध्यान दिवसाचे औचित्य साधून प्रशांत भिलारे यांनी ध्यानधारणेचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिक दिले

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.