उदगीर कथित जिल्हा निर्मिती ; खोटे मेसेज टाकणाऱ्यावर कार्यवाही करा - आ चिखलीकर.

 उदगीर कथित जिल्हा निर्मिती ; खोटे मेसेज टाकणाऱ्यावर कार्यवाही करा - आ चिखलीकर.

-----------------------------

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

-----------------------------

उदगीर जिल्हा होणार असून २६ जानेवारी रोजी स्थापना होईल असे फेक नरेटिव्ह पसरविले जात आहे. तसा कोणताही प्रस्ताव नाही किंवा शासकीय पातळीवर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना माहिती नाही तरी काहीजण मुद्दामहून खोटी माहिती व मेसेज फारवर्ड करून जनतेत चुकीचा संदेश पसरविला जातो आहे, असा खोटा मेसेज तयार करून सगळीकडे नरेटिव्ह पसरविणाऱ्याचा शोध घ्यावा व त्यावर कार्यवाही करावी असा सूचना आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी  तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.

मागील आठवड्यापासून  उदगीर जिल्हा होणार असून २६ जानेवारी रोजी स्थापना होणार आहे त्यात उदगीर अहमदपूर, देवणी जळकोट तसेच नांदेड जिल्ह्यातील लोहा, कंधार, मुखेड, तालुक्याचा समावेश होणार आहे. असा आशयाचा मेसेज व उदगीर कथित  जिल्ह्याचा नकाशा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. फेसबुकवर कोणती ही शहानिशा न करता अनेक सुज्ञजणांनी पोस्ट केल्या .यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडून खातरजमा करून घेण्याची तसदी  युजर्सना वाटली नाही.आणि सगळीकडे धुमधडाक्यात मेसेज सुरू झाले.काहींनी तर पाणी गेले ...गावेही जाणार असा शोध लावला.काहींनी तर एमएच २६ यावर प्रेम दाखवले. ज्याला जे वाट्टेल ते सोशल मोडियात युजर्स  बोलत सुटले. काही यु ट्यूबवाल्यानी आपण आता फक्त एक महिण्याचेच नांदेड जिल्हा वासीय आहोत त्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या नंतर ता लोहा -ता कंधार जि उदगीर असे  होणार (?) यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले .या कथित जिल्हा निर्मितीसाठी मंत्रिमंडळ ठराव , दावे हरकती लागतात.एकच जिल्हा कसा करता येईल(?) यासह अनेक प्रशासकीय अडचणींवर कोणीच लक्ष दिले नाही लातूर लोकसभा मतदार संघात  लोहा कंधार आहे म्हणून उदगीर मध्ये आपण जाणार असा अंदाज बांधून हे सगळे फेक नरेटिव्ह सुरू झाले

   आ चिखलीकर यांनी या कथित जिल्हा प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली .जिल्हा निर्मितीसाठी कोणताही प्रस्ताव नाही शिवाय उदगीर जिल्हा होत असेल ते होऊ द्या आम्हाला काहीच हरकत नाही पण लोहा कंधार तालुक्यातील एकही गाव-वाडी -तांडा  जाणार नाही .असे जाहीर केले तसेच ज्यांनी कोणी अफवा पसरविली त्याचा शोध घ्यावा व त्याच्या विरुद्ध कडक कार्यवाही करावी असा सूचना तहसीलदार व पोलीस प्रशासनाला त्यांनी दिल्या आहेत त्यामुळे उदगीर कथित  जिल्हा चर्चेवर पडदा पडला असे मानले जाते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.