शिरोली येथे दारूच्या नशेत बसवर दगडफेक.

 शिरोली येथे दारूच्या नशेत बसवर दगडफेक.

------------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------------ 

शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील दिल्ली दरबार हॉटेल जवळ एका व्यक्तीने दारूच्या नशेत बसवर दगडफेक केल्याने बसमधील तिन प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. कोल्हापूरहून शिरोली माळवाडी व पेठवडगाव कडे निघालेल्या केएमटी बसवर नागेश अर्जुन वाईडे रा. जालना याने दारूच्या नशेत दगडफेक केल्याने बस मधील राहूल सुनीलकुमार चोपडे वय २५ (भादोले), संचिता नितीन कांबळे (वय १७) स्नेहल सुनिल कांबळे (वय २१) हे तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक उपचारासाठी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उचारासाठी कोल्हापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राहूल हा भादोले गावचा रहिवाशी असून तो कामानिमित्त कोल्हापूर येथे गेला होता आपले काम उरकून तो पेठवडगाव केएमटी बसने गावाकडे जात होता.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.