महावितरणचा भोंगळ कारभार कांटे बुरंबाळ मार्गावर कोसळले विद्युत खांब.
महावितरणचा भोंगळ कारभार कांटे बुरंबाळ मार्गावर कोसळले विद्युत खांब.
-------------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
-------------------------------------
अपघाताच्या घडतायत घटना, विद्युत प्रवाह नियमित करण्याची मागणी.
शाहूवाडी : कांटे बुरंबाळ मार्गावर शेती पंपासाठी असणाऱ्या विद्युत वाहिनीचे खांब कोसळले असून या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरत आहे. या घटनेला एक आठवडा होऊन सुद्धा महावितरणचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नसल्याने महावितरण चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या आठवड्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस व जोरदार वादळ यामुळे घनदाट जंगलातून असलेल्या कांटे ते बुरंबाळ या मार्गावरील शेतीपंपासाठी असलेल्या विद्युत वाहिनीवर झाडे पडल्याने वाहिनीचे सहा खांब मोडून पडले असून विद्युत वाहिनीच्या सर्व तारा रस्त्यात पसरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी या तारांमध्ये दुचाकी अडकून बुरंबाळ मधील एका दुचाकी स्वराचा अपघात झाला आहे, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या मार्गावर दैनंदिन शालेय विद्यार्थी, नागरिकांची ये जा सुरू असून नागरिकांच्या जिवाला आला धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक स्थितीमध्ये याच रस्त्यावरून ऊस वाहतूक, दूध वाहतूक सुरू आहे, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच महावितरण विभागाला जाग येणार का ?असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत .तसेच वारंवार महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी बोलून सुद्धा' अपुरे मनुष्यबळ' हे कारण सांगून नेहमीच उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत, डिसेंबर महिना संपत आला तरीसुद्धा कांटे बुरंबाळ गावांमधील ऊस लागणी पाण्याअभावी खोळंबल्या आहेत, तुटून गेलेले खोडवा पीक पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. पडलेले खांब तात्काळ उभे करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
Comments
Post a Comment