डाटा एन्ट्री ऑपरेटर वेतन श्रेणी लागू करा
डाटा एन्ट्री ऑपरेटर वेतन श्रेणी लागू करा.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजितसिह. ठाकुर
-------------------------------
राज्यात 20 फेब्रुवारी 2013 च्या शासन निर्णय राज्यात मतदार मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार बाह्य यंत्रणेद्वारे डाटा एन्ट्री ऑपरेटर ची मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक तालुका स्तरावर 1 व जिल्हास्तरावर 1 असे डाटा एन्ट्री ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 12 वर्षापासून सदर डाटा एन्ट्री ऑपरेटर कार्यरत असून त्यांना शासकीय सेवेत नियमित करणे, तसेच मानधन वाढवून 35000 रू करणे बाबत आज दिनांक 23 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील निवडणूक विभागात कार्यरत असलेले डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनी जिल्हाधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांना निवेदन दिले निवेदन देताना अजय बांडे, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम. देविदास धामणकर, तहसील कार्यालय वाशिम, मिलिंद भगत, तहसील कार्यालय मंगरूळपीर, तुषार जाधव, तहसील कार्यालय कारंजा, लखन राठोड, तहसील कार्यालय मानोरा, विष्णू टोंचर तहसील कार्यालय रिसोड, राजेश शर्मा, तहसील कार्यालय मालेगाव हे हजर होते.
Comments
Post a Comment