खाजगी बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने दाऊतवाडी बस पलटी होऊन एक जण ठार झाला अकरा जखमी.

 खाजगी बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने दाऊतवाडी बस पलटी होऊन एक जण ठार झाला अकरा जखमी.

------------------------------------ 

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------------ 

कोकणातून पुण्याला जाणारी खाजगी बस दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे आली असता बस वरी ल चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याने त्यामधील एक प्रवासी मयत झाला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली

कोकणातून राधानगरी मार्गे पुण्याला जाणारी श्रेयश ट्रॅव्हल्स ची बस नंबर एम एच 11 सी एच ७४२२ ही दाऊतवाडी तालुका राधानगरी येथे आज गुरुवार रात्री दोन वाजण्याच्या सुमारास भर दाव वेगाने आली असता बस चालक संदीप रामराव फड राहणार लातूर जिल्हा लातूर याचा बस वरील ताबा सुटल्याने बस पलटी झाल्याने त्यामधील 12 प्रवासी प्रवास करत होते त्यामधील मेहबूब त्याचे पूर्ण नाव उपलब्ध नाही हा मयत झाला असून या अपघाताची फिर्याद निहार नरेंद्र साळवी राहणार टेंबे तालुका रत्नागिरी यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिल्यावर बस चालक संदीप फड याने महबूब या प्रवाशास मूर्तीस कारणीभूत ठरल्या च्या कारणा वरून बस चालक संदीप फड याच्याविरुद्ध राधानगरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कोळी व खामकर हे करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.