परभणी घटनेतील मयत तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी लोहा शहर कडकडीत बंद.
परभणी घटनेतील मयत तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी लोहा शहर कडकडीत बंद.
------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबना प्रकरणी परभणी येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध नोंदवित असताना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्यात पस्तीस वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. १६ रोजी सोमवारी मराठवाडा बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत लोहा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदवल्याने शहर कडकडीत बंद होते.
लोहा शहरातील क्रांतीसुर्य बुद्ध विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविला. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. १६ रोजी सोमवारी मराठवाडा बंदचे आवाहन केले होते. त्यास लोहा शहरात प्रतिसाद मिळाला. परभणी येथील दंगलीत समावेश असल्याचा ठपका ठेवून सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यास न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यादरम्यान दि. १५ रोजी सकाळी कोठडीतच सोमनाथचा मृत्यू झाला. त्या निषेधार्थ लोहा शहरातील विविध आंबेडकरी संघटनांनी बंद मध्ये सहभाग घेवून विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार राजेश पाठक व पो. नि. नागनाथ आयलाने यांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या त्यामध्ये पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन आणि एकंदरीत सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, कलम १७६ (१अ) सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी, संपूर्ण न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधिशांकडुन न करता सिटींग न्यायाधिशा मार्फत करावी, पोलिस निरिक्षक अशोक घोरबांड सह ईतर पोलिस अधिकाऱ्यांवर कलम ३२ अन्वये अॅट्रासिटी कायद्यान्वये कलम ३ (१) आणी ३ (२) प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबतच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, परभणी शहरातील सर्व पोलिस ठाणे, मंदिर येथील सीसीटिव्ही तातडीने जप्त करुन तपासावे, शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने ५० लक्षांची अर्थीक मदत करावी, शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस तातडीने शासकीय नौकरीत घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे तसेच आंदोलनातील वच्छलाबाई मानवते या महीलेला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कलम ३५४ व ३०७ कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्यांना निलंबित करावे, पोलिसांच्या कोंबिंग कार्यवाहीत निर्दोष जखमी झालेल्यांना तातडीने अर्थीक मदत द्यावी, भारतीय संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या माथेफिरू सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, माजी नगरसेवक बबन निर्मले, बालाजी खिल्लारे, नगरसेवक पंचशिल कांबळे, रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, माजी नगरसेवक उत्तम महाबळे, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा सचिव रत्नाकर महाबळे, पत्रकार डी. एन. कांबळे, पत्रकार प्रदीपकुमार कांबळे, अनिल धुतमल, सतिष निखाते, केतन खिल्लारे, धोंडीबा यानभुरे, निखिल महाबळे, बाळासाहेब थोरात, पत्रकार शिवराज दाढेल, सचिन आढाव, छगन हटकर, सुभाष खाडे, किशोर भोळे, गिरीष भालेराव, नवनाथ आढाव आदींसह बहुसंख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Comments
Post a Comment