ओगलेवाडी तालुका कराड येथील युवकाकडून एक देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत.
ओगलेवाडी तालुका कराड येथील युवकाकडून एक देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत.
-----------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-----------------------------------------
बातमी सविस्तर अशी की, गोपनीय माहितीदाऱाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एक इसम पिस्टल घेऊन मौजे अंतवडी तालुका कराड गावाचे हद्दीत मसूर ते शामगावं रस्त्यादरम्यान जाणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना व त्यांच्या पथकास सदर परिसरात कारवाईच्या सूचना दिल्या, प्राप्त माहिती आणी वर्णनानुसार सदर एका संशयितास ताब्यात घेतले असता सदर व्यक्तीजवळ 1 देशी बनावट पिस्टल 1 जिवंत काडतूस व हिरो एच एफ डीलक्स मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला गेला असून आरोपी चे नाव संदेश सतीश ताटे वय 19 वर्षे असून सदर व्यक्ती ओगलेवाडी तालुका कराड येथील रहिवाशी आहे. सदर कारवाईचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment