परभणी येथील आंदोलनात तरुणाचा मृत्यू ; कार्यवाहीच्या मागणीसाठी सोमवारी लोहा बंदचे आवाहन .
परभणी येथील आंदोलनात तरुणाचा मृत्यू ; कार्यवाहीच्या मागणीसाठी सोमवारी लोहा बंदचे आवाहन
लोहा,
परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीचे दगडफेक करून नासधूस केल्या प्रकरणी परभणी येथे झालेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कोठडीत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ दि. १६ रोजी सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोहा बंदचे आवाहन केले आहे.
परभणी येथे एका माथेफिरूने बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतीकृतीची नासधूस केल्याप्रकरणी परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर केलेल्या लाठीहल्यात परभणी येथील उच्चशिक्षित भीमसैनिक तरुण सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला. त्या प्रकरणी आंदोलनात पोलिसांकडून दाखल केलेले खोटे गुन्हे दाखल करून आंदोलक तरुणांना शहीद होई पर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. त्यानुसार दि. १६ रोजी सोमवारी लोहा बंद करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोहा पोलिस ठण्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा उपाध्यक्ष अनिल गायकवाड, बालाजी खिल्लारे, नवनाथ आढाव, नगरसेवक प्रतिनिधी केतन खिल्लारे, सचिन आढाव यांच्या स्वाक्षरी आहे.
Comments
Post a Comment