किरण दादा बगाडे यांनी निवेदन केले सादर.
किरण दादा बगाडे यांनी निवेदन केले सादर.
--------------------------------
जावली प्रतिनिधी
--------------------------------
जगातील बलाढ्य लोकशाही ज्या संविधानानुसार चालते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले देशाच्या संविधानाची परभणी येथे एका माथेफिरूने विटंबना केली याचा निषेध व्यक्त करत या माथेफिरू ला कठोर शासन झाले पाहिजे या प्रवृत्ती च्या मागे कोण असेल तर त्याचा पोलिसांनी मुळापर्यंत शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष किरणदादा बगाडे यांनी निवेदनाद्वारे केली
जावली तालुक्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर व सपोनि पृथ्वीराज ताटे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला संविधान दिले. संविधान रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे महाराष्ट्रात महिलांवरील होणारे अत्याचार,महापुरुषांची विटंबना,संविधानाची विटंबना,हे सातत्याने घडत आहे त्याच संविधानामुळेच नागरिकांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले,त्याच संविधानावर आज संपूर्ण देश चालतो मात्र परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाच्या प्रतिकृती ची विटंबना करणाऱ्या त्या माथेफिरू चे कृत्य निंदनीय आहे त्याच्या पाठीमागे मास्टर माईंड कोण आहे याचा पोलीस प्रशासनाने तपास करावा व अशा प्रवृत्तीना जागीच ठोकून काढावे आणि कठोर कारवाई करावी
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष किरणदादा बगाडे,प्रवीण चव्हाण,सयाजी भिसे,सूरज चव्हाण,सुरज भिसे,जितू परिहार,अमोल गंगावणे, अविराज परिहार सूर्यकांत जाधव शँकर भिसे व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
सूर्यकांत जाधव
जावली प्रतिनिधी
Comments
Post a Comment