कळंबा महाली चा सुपुत्र करणार महाराष्ट्र कबड्डी संघाचे नेतृत्व.
कळंबा महाली चा सुपुत्र करणार महाराष्ट्र कबड्डी संघाचे नेतृत्व.
------------------------------------
रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर.
------------------------------------
नुकतीच ठाणे येथे दिनांक 18 डिसेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज कबड्डी संघ कळंबा महाली चा राष्ट्रीय खेळाडू अंकुश लक्ष्मणराव महाले यांची महाराष्ट्र कबड्डी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
दिनांक 3 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धे करिता महाराष्ट्र राज्य पुरुष व महिला कबड्डी संघाची निवड चाचणी सचिवालय जिमखाना यांच्या वतीने ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये पुरुष संघांमध्ये सलग सातव्यांदा निवड करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज क्रीडा मंडळाचा खेळाडू अंकुश महाले यांना पुरुष संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली तर महिला संघाच्या कर्णधार पदी आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे यांची निवड करण्यात आली.अंकुश महाले यांच्या सोबतच वाशिम जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सचिव तथा अनेक युवकांचे आधारस्तंभ असणारे डॉ. भागवतराव महाले यांचे चिरंजीव अजिंक्य महाले यांची सुद्धा निवड या संघात झाली आहेआली.वाशिम जिल्ह्यातील कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंबा महाली परिसरामध्ये महाराष्ट्र संघात 2 खेळाडूंची निवड झाल्याने उत्साहाचे वातावरण आहे.या खेळाडूंनी आपल्या निवडीचे श्रेय छत्रपती संभाजी महाराज कबड्डी संघाच्या सर्व सदस्यांना दिले आहे. यामध्ये विशेषकरून संस्थेचे अध्यक्ष डॉ. भागवतराव महाले, कळंबा महाली चे आदर्श सरपंच बाबुराव दादा महाले, संघाचे प्रशिक्षक आनंदभाऊ हेगडे, श्री. मदन बावस्कर सर, मारुती कवालदार सर आणि संतोषभाऊ जाधव, सुरेंदरसिंग मेहरा व किसन महाले यांना दिले आहे.या स्पर्धेकरिता पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून आनंदभाऊ हेगडे तर व्यवस्थापक म्हणून जयवंत शेट्ये सर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर महिला संघाच्या व्यवस्थापक पदी गणेश भोईर तर प्रशिक्षक पदी संतोषभाऊ जाधव राष्ट्रीय खेळाडू ज्यांनी अनेक मैदाने गाजविली तसेच 2 वेळा महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. या अनुभवी प्रशिक्षकांचा संघाला नक्कीच फायदा होईल. या स्पर्धे करीता महाराष्ट्राचे संघ पुढील प्रमाणे.
पुरुष -
अंकुश महाले (कर्णधार),निलेश चिंदरकर,मारोती पवार, शुभम मोठे,निवृत्ती जगताप, अजिंक्य महाले, विक्रम कदम, सुरज कांबळे, बालाजी क्षीरसागर, शुभम सुर्वे, कुणाल शिंदे, विशाल कोटमे,नागराज जाधव, नितीश मोरे.
महिला संघ -
स्नेहल साळुंखे (कर्णधार, आंतरराष्ट्रीय खेळाडू), सुवर्णा बारटक्के (आंतरराष्ट्रीय खेळाडू)सायली जाधव (आंतरराष्ट्रीय खेळाडू), ज्योती राक्षे, जयश्री साठे, मनिषा मानकर, कल्पिता शिंदे, स्वाती काकडे, अल्का निमसे,वैशाली खरमाळे, माधवी राऊत, मनिषा जगताप, सारिका क्षीरसागर, प्रियंका तावडे.
Comments
Post a Comment