सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी -आ.राहुल आवाडे यांची अधिवेशनात मागणी.

सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी -आ.राहुल आवाडे यांची अधिवेशनात मागणी.

-----------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------------

इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत मंजूर केलेली सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सुळकूड पाणी प्रश्‍नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली आहे.

राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत 160.84 कोटीची सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे. या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियासुध्दा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही. वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ  पाण्याची गरज असल्याने सुळकूड योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. याच सुळकूड योजना संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला.

आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी, वस्त्रनगरी इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत चालला आहे. तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानकोपर्‍यातून अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. सुळकूड योजना मंजूर असून त्यासाठीची निविदा प्रक्रियाही करण्यात आलेली आहे. परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने सुळकूड योजना संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी केली.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.