उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात एड्स जनजागृती
*उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात एड्स जनजागृती*
रिसोड: प्रतिनिधी. रणजीत सिंह ठाकुर
उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रेबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना एचआयव्ही विषयी माहिती देण्यात आली.
कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुळकर्णी होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयसीटीसी च्या अंजली गायकवाड मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाला त्यांच्यासह तंत्रज्ञ निखाडे साहेब व एनजीओ श्री शेजुळ विशेष उपस्थितीत होते .प्राचार्य कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात राष्ट्रीयसेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावात जाऊन एचआयव्ही चाचणी करणे आवश्यक आहे अशी जनजागृती केली पाहिजे .पूर्णपणे बरा करण्यासाठी आजही कोणतेही औषधाचा शोध लागला नाही मात्र बाधित व्यक्तीच्या आयुष्य वाढवण्यासाठी विविध औषध उपचार सध्या उपलब्ध आहे योग्य काळजी व दक्षता घेतल्यास या रोगाची निर्मूलन शक्य आहे असे म्हटले तर प्रमुख मार्गदर्शिका ICTC अंजली गायकवाड मॅडम यांनीआपल्या समउपदेशात एड्सची लक्षणे तथा कारणे याविषयी मार्गदर्शन केले . एचआयव्ही होवू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी याचे विश्लेषणही त्यांनी यावेळी केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. एम.पी. खेडेकर मॅडम यांनी केले . तर सुगसंचालन उर्मिला गिरी हीने केले आभार वैष्णवी घोडे हीने केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. टिकार, प्रा. बोंडे, प्रा. आ. बुधवंत, प्रा. डॉ. नंदेश्वर, प्रा. डॉ . मेश्राम तसेच रा.से. योजनेच्या स्वयंमसेवकांनी मोलाचे सहकार्य केले .कार्यक्रमाला प्रा.डॉ. नरवाडे, प्रा. मुंढे, प्रा. कदम, प्रा. पांढरे, प्रा.संदीप जुनघरे, प्रा.राम जुनघरे, प्रा. राऊत, प्रा. बाजड, प्रा. साबळे, प्रा. पाठक मॅडम, प्रा. बोंडे मॅडम, मालवे मॅडम, श्री पुरी, घुगे, पांडे, मानमोठे मॅडम, जमदाडे, श्री चराटे, गजू जाधव, सुरज नरवाडे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment