परळी येथील घरफोडीचा गुन्हा 12 तासात उघडकीस 3लाख 10 हजार रोख रक्कम हस्तगत सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी. पथकाची दमदार कामगिरी.
परळी येथील घरफोडीचा गुन्हा 12 तासात उघडकीस 3लाख 10 हजार रोख रक्कम हस्तगत सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी. पथकाची दमदार कामगिरी.
----------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी :
अमर इंदलकर
---------------------------------------
सातारा तालुका पोलीस ठाणे येथे फिर्यादी डॉक्टर मुराद आलम मुलाणी यांनी त्यांच्या परळी येथील क्लीनिकच्या वरील घरात बेडरूम मधील कपाटात मुलाच्या शिक्षणाकारिता ठेवलेले 3 लाख 10 हजार रोख रक्कम घरफोडी होऊन चोरीला गेलेबाबत गुन्हा 19/12/2024 रोजी नोंद केला होता. सदर गुन्ह्याबाबत सातारा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणाचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, सफौ वायदंडे, पोलीस हवालदार संदीप कर्णे, पोलीस हवालदार दादा स्वामी, पोहवा शिखरे, महिला पोलीस हवालदार मंडले, पोना प्रदीप मोहिते, पोकॉ संदीप पांडव पो कॉ शिवाजी डफळे, ह्या सर्व टीमने कसोशीने चौकशी करून माहिती गोळा करून एका संशयित महिलेस ताब्यात घेतले व चौकशी केली असता सदर महिलेने गुन्हा कबूल केला असून सदर आरोपी महिलेचे नाव वैशाली रामा ढेपे हे आहे. वरील कामगिरी पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा, वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, राजीव नवले उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment