Posts

Showing posts from December, 2024

सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये बदल अशाप्रकारे.

Image
  सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये बदल अशाप्रकारे.  ------------------------------------- सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर  ---------------------------------- श्री सेवागिरीमहाराज यात्रा पुसेगाव ह्या ठिकाणी सालाबाद प्रमाणे भरत असते जिल्हा राज्य देश-विदेश अशा विविध ठिकाणाहून भाविक मोठ्या संखेने पुसेगावात उपस्थित राहतात जवळ जवळ 7-8 लाख लोकसंख्या भाविकांची गर्दी उसळलेली असते  रस्त्याच्या दुतर्फा लागणारी दुकाने गाड्या आणी भाविकांची गर्दी ह्यामुळे वाहतुकीवर परिणाम होणेची शक्यता असले कारणाने वाहतूक सुरळीत राहण्याकरिता आणी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी दिनांक 25/12/2024 ते 04/01/2025 रोजी अखेर यात्रादरम्यान पुढीलप्रमाणे वाहतुकीत बदल केला गेलेला आहे --- 1)सातारा बाजूकडून दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगावं गावात न जाता  नेर, ललगून,बुध, राजापूर, कुळकजाई, मलवडीमार्गे - दहिवडीकडे जातील. अथवा सातारा बाजूकडून  दहिवडी बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता विसापूर फाटा  जाखनगाव खातगुण कटगुण मार्गे दहिवडीकडे जातील.

छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मेढा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

Image
  छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मेढा येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष. ---------------------------------  भणंग प्रतिनिधी  शेखर जाधव ---------------------------------  सातारा जावली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार  श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मेढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्याची आतषबाजी गुलालाची उधळण डॉल्बीच्या तालावर ठेका धरून एकमेकांना पेढे भरून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नेते उद्योजक श्री विजयजी शेलार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विठ्ठलजी देशपांडे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री शिवाजीराव मर्ढेकर मा उपसभापती कांतीभाई देशमुख नगराध्यक्ष पांडुरंग जवळ उपनगराध्यक्ष दत्तात्रेय पवार बांधकाम सभापती विकास देशपांडे नगरसेवक शशिकांत गुरव शिवाजी गोरे सादिक सय्यद प्रवीण ओतारी धनंजय खटावकर संजय सपकाळ बाळासाहेब पंडित प्रमोद पार्टे रमेश देशमुख बाबू देशमुख विजय शिंदे बाबुशेठ पवार निखिल ओतारी शंकर देशमुख ...

लोह्यात श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न.

Image
  लोह्यात श्री संत रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न. ----------------------------------- लोहा प्रतिनिधी अंबादास पवार ----------------------------------- लोह्यातील भव्य रक्तदान शिबीरात तब्बल १०० रक्दांत्यानी केले रक्तदान.        स्वानंद सुखनिवासी,वेदांत केसरी,ब्रह्मीभूत श्री संत रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नगरेश्वर मंदिर लोहा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन काल  दि.१९ सप्टेबर रोजी करण्यात आले होते.सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत रक्त दान शिबिर घेण्यात आले. तत्पूर्वी प्रथमत; हभप सखाराम महाराज व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.        यावेळी माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमवार,नगरेश्वर मंदिर लोहाचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार व समस्त आर्य वैश्य युथ आदींच्या उपस्थितीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले.सदरील रक्तदान शिबिरात तब्बल १०० रक्त दांत्यानी रक्तदान केले.         भव्य रक्तदान शिबिराचे आयोजक शंकर सावकार वट्टमवार,राजेश कोटलवार,राहुल  कोंड...

कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार सुनिल भारमल यांना.

Image
  कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार सुनिल  भारमल यांना. ----------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------ रुकडी गावाचे सुपुत्र  सुनिल मारुती भारमल यांना इंडियन पोलीस मित्र ह्याच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन 2024 चा "कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार "हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल रुकडी गावाचे लोकनियुक्त सरपंच सौ. राजश्री संतोष रुकडीकर ह्याचे हस्ते आज रुकडी ग्रामपंचायत मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी  बोलताना मा ,.उप सरपंच शीतल खोत,सौ राजश्री संतोष रुकडीकर ह्यांनी सामाजिक क्षेत्रात कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवाभावी वृत्तीने सतत कार्यरत असणाऱ्या श्री.सुनिल भारमल ह्याच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे रुकडी गावाच्या नावालौकिकात भर पडत असून आपल्या मार्फत असेच सामाजिक कार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.सदर सत्कार समारंभास उपसरपंच सौ मालती दिलीप इंगळे व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

“नि:स्वार्थ सेवाभाव, हा स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचा स्थायीभाव होता.

Image
 “नि:स्वार्थ सेवाभाव, हा स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांचा स्थायीभाव होता. ---------------------------------------  वाई प्रतिनिधी  कमलेश ढेकाणे  ---------------------------------------   श्री. विजय वाघ वाई : दि.१९/११/२०२४ "स्व. भांऊ आपल्या सामाजिक, राजकीय जीवनात समाजाच्या प्रगतीसाठी नि:स्वार्थ भावनेने झटत राहिले परंतु त्या मोबदल्यात स्वतःसाठी किंवा आपल्या कुंटुंबासाठी काहिही मागीतले नाही. निःस्वार्थ सेवाभावी वृत्ती ठेवून; अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी आपला देह झिजवला. असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात होणे नाही.  हजरजबाबी, सतत आनंदी, निटनेटकेपणा, तीक्ष्ण नजर व पारदर्शी कारभार असे विविध पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात होते.  भाऊंना शेती विषयी प्रचंड आवड आणि आस्था होती. शास्त्रीय संगीताची, विशेष करुन मराठी, हिंदी, उर्दु गजल कवितांची आवड असल्याने ते एक उत्तम रसिकही होते." असे प्रतिपादन श्री. विजय वाघ यांनी केले. येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या सातव्या मासिक ...

सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी -आ.राहुल आवाडे यांची अधिवेशनात मागणी.

Image
सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी -आ.राहुल आवाडे यांची अधिवेशनात मागणी. ----------------------------------- कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ----------------------------------- इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत मंजूर केलेली सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्यावर बोलताना केली. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात बोलताना आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी सुळकूड पाणी प्रश्‍नावर आवाज उठवत आपल्या कामकाजाची झलक दाखवून दिली आहे. राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत 160.84 कोटीची सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे. परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे. या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियासुध्दा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही. वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ  पाण्याची गरज असल्याने सु...

भाजपा राष्ट्रीय समर्थक मंचाच्या प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार वसंतराव देशमुख यांची नियुक्ती.

Image
  भाजपा राष्ट्रीय समर्थक मंचाच्या प्रदेशाध्यक्षपदी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार वसंतराव देशमुख यांची नियुक्ती. ----------------------------------------- फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. ----------------------------------------- अमरावती. भारतीय जनता पार्टीने , जालना येथील भाजप समर्थक मंचाच्या प्रदेशा अध्यक्ष पदावर वसंतराव देशमुख जालना येथील यांची नियुक्ती केलेली आहे या व्यक्तीचे आकर्षक व्यक्तिमत्व तसेच अहोरात्र जनतेच्या प्रश्नकर्ता आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार ख्यात असलेले त्यांच्या कर्तव्यातून भा.ज.प.पक्षाने, प्रदेशाध्यक्षपदी निवड केलेली आहे.सदर व्यक्तीचे कर्तत्व फार मोठे असून अनेक संघटनेची जुळलेले आहेत ते अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मानव अधिकार मिशन या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष( ब्रिक्सहुमनराईटसमानव अधीकार मीशन संघटने पदी नियुक्ति केल्या गेले आहेत .दैनिक एकनिष्ठा,  वृत्त संकलनाचे कार्यकारी संपादक असून त्यांचा जनतेशी दांडगा संपर्क आहे.प्...

बसरगी (ता.जत) येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

Image
  बसरगी (ता.जत) येथे सांगली जिल्ह्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून ११०० शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीजपुरवठा. *सांगली / कोल्हापूर  दि. 19 डिसेंबर २०२४:* - शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिला चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसरगी (ता.जत) येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे बसरगी, सिंदुर व गुगवाड या गावांतील ११०० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे.  कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे. *कोल्हा...

शाहुपुरी पोलिसांनी केली दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक.

Image
  शाहुपुरी पोलिसांनी केली दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक. दिनांक १६/१२/२०२४ रोजी दोन इसम मार्केट यार्ड येथे एक चोरीची मोटारसायकल विक्री करणे करीत येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाणे कडील विकास चौगुले व सनिराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फात मिळाली मिळालेल्या माहितीनुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांचे मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाणे कडील सहाय्यक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, रवी आंबेकर,महेश पाटील, सुशील गायकवाड यांनी आकाश पान शॉप मार्केट यार्ड येथे सापळा रचला असता सायंकाळी ०६.३० वा आकाश पान शॉप येथे दोन इसम एका मोटारसायकल वरून येताना दिसले बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार दोन इसमाचे  वर्णन जुळत असल्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले त्यांचा पाठलाग करून त्यांना थोड्या अंतरावर  पकडले  त्यांचे नाव व गाडीच्या कागदपत्रा बाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अमित श्रीराम विश्वकर्मा वय ३५ रा. लेटस ग्रुप, उचगाव कोल...

ओगलेवाडी तालुका कराड येथील युवकाकडून एक देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत.

Image
  ओगलेवाडी तालुका कराड येथील युवकाकडून एक देशी बनावटीचे पिस्टल हस्तगत.  ----------------------------------------- सातारा जिल्हा प्रतिनिधी  अमर इंदलकर  ----------------------------------------- बातमी सविस्तर अशी की,  गोपनीय माहितीदाऱाकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एक इसम पिस्टल घेऊन मौजे अंतवडी तालुका कराड गावाचे हद्दीत मसूर ते शामगावं रस्त्यादरम्यान जाणार असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना व त्यांच्या पथकास सदर परिसरात कारवाईच्या सूचना दिल्या, प्राप्त माहिती आणी वर्णनानुसार सदर एका संशयितास ताब्यात घेतले असता सदर व्यक्तीजवळ 1 देशी बनावट पिस्टल 1 जिवंत काडतूस व हिरो एच एफ डीलक्स मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला गेला असून आरोपी चे नाव संदेश सतीश ताटे वय 19 वर्षे असून सदर व्यक्ती ओगलेवाडी तालुका कराड येथील रहिवाशी आहे. सदर कारवाईचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अभिनंदन केले आहे.

एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबली येथे विद्यार्थी गुणगौरव, सत्कार समारंभ अतिशय उत्साहात संपन्न.

Image
  एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज,बाहुबली येथे विद्यार्थी गुणगौरव, सत्कार समारंभ अतिशय उत्साहात संपन्न. ------------------------------------  कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे ------------------------------------  यांची शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली येथे बुधवार दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी विद्यार्थी गुणगौरव, सत्कार समारंभ व स्नेहभोजन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष  बाबासाहेब पाटील ,कोषाध्यक्ष बाहुबली विद्यापीठ बाहुबली हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हसमुखलाल प्रेमचंद गाला, कोल्हापूर शिवगोंडा दादा सदलगे,कोल्हापूर, बाबासाहेब चौगुले, सदस्य शालेय समिती,बाहुबली हे उपस्थित होते. तसेच संस्थेचे महामंत्री डी. सी. पाटील हे उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थिती रवींद्र खोत, सदस्य,बाहुबली विद्यापीठ बाहुबली,अशोक पाटील, सदस्य बाहुबली ब्रह्मचर्याश्रम बाहुबली, एस.बी. चौगुले, सहसचिव, समन्वय समिती, बाहुबली, एडवोकेट सुधीर पाटील, सदस्य शालेय समिती,बाहुबली आप्पासाहेब चौगुले उपाध्यक्ष दिगंबर जैन एन्डोमेंट ट्रस्ट,...

एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष 3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव.

Image
  एसटी महामंडळाचा गोंधळ चव्हाट्यावर; रिक्त दाखविली शून्य पदे आदिवासींचा अनुशेष 3,2६3 पदांचा क्लास वनचे केवळ पद राखीव. ------------------------------------- फ्रंटलाईव्ह न्युज महाराष्ट्र अमरावती जिल्हा प्रतिनिधी पी.एन.देशमुख. ------------------------------------- अमरावती. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण मंजूर पदे१ लाख २२ हजार ८९3 आहेत.यातील११हजार १पदे, अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत .अनुसूचित जमातीच्या भरलेल्या पदांची संख्या ७ हजार ७3८ आहे.पूर्वीचा अनुशेष 3 हजार २६3पदाचा आहे.अनुसूचित जमातीच्या राखीव जागावर नियुक्त झालेल्या व नंतर मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे ,आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या ६01आहे.तर आधी संख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आल्यामुळे रिक्त झालेल्या पदांची संख्या शून्य दाखविण्यात आली आहे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते अरविंद वळवी यांनी माहिती अधिकाऱ्यांतर्गत ही माहिती मागितली आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात एकूण गट अ ची१४७, पदे मंजूर आहेत या जीएसटी संवर्गाचे राखीव पद एक आहे यापैकी अनुसूचित जमातीच्या...

पीडी’ ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्ती‘अभय’ योजनेला उरले आता १४ दिवस.

Image
  पीडी’ ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्ती‘अभय’ योजनेला उरले आता १४ दिवस. पुणे विभागात आतापर्यंत २३ हजार ७७९ वीजग्राहक सहभागी. *पुणे, दि. १७ डिसेंबर २०२४:* वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १४ दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील २३ हजार ७७९ लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. थकीत वीजबिलांमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकब...

निमित्त जयंतीचे,बालचमुंच्या प्रबोधनाचे.

Image
निमित्त जयंतीचे,बालचमुंच्या प्रबोधनाचे. ------------------------------------ कुंभोज प्रतिनिधी  विनोद शिंगे ------------------------------------   दिंडीचे आयोजन हे छोटं पाऊल असलं तरी समाजाच्या परिवर्तनासाठी मात्र मोठं पाऊल आहे हा उद्देश लक्षात घेऊन गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते गुरुदेव श्री 108 समंतभद्रजी महाराज यांच्या 132 व्या जन्मजयंती निमित्त श्री बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबली या प्रशालेची 12 वी *समाज प्रबोधन दिंडी* मंगळवार दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी कवठेसार (ता. शिरोळ )मध्ये आयोजित करण्यात आली.      कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण व स्वागतगीताने झाली. गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. कार्यक्रमाच्या स्वागत व प्रास्ताविकात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता पाटील मॅडम यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला.या समाज प्रबोधन दिंडीचे उद्घाटन मा. श्री. पोपट भोकरे (लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत, कवठेसार) यांच्या शुभहस्ते करण्यात आले,तर सत्य आणि प्रगत...

मानव मुक्तिचा जाहीरनामा म्हणजे संविधान - जगदीश ओहोळ.

Image
  मानव मुक्तिचा जाहीरनामा म्हणजे संविधान - जगदीश ओहोळ. -------------------------------- इचलकरंजी प्रतिनिधी  विनोद शिंगे -------------------------------- इचलकरंजी :- *संविधान हे कोणत्याही जातीची ,धर्माची मालमता नाही.संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे यायला हवं कारणा संविधान हे दुसरे तिसरे काही नसून त्ये मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे.ज्यामध्ये तुमच ,माझं आणि आपल्या पुढच्या पिढीच आणि या देशाच उज्वल भविष्य आहे.असे वक्तव्य सुप्रसिद्ध लेखक व व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी केले.ते शाहू महोत्सव अंतर्गत श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे आयोजित संविधान जागर या कार्यक्रमा मध्ये बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी विद्यालयाच्या मुख्यध्यापिका सौ.मंजुषा रावळ होत्या.* पुढे त्ये म्हणाले,*संविधान म्हणजे स्त्री पुरुष्याच्या बरोबरीने काम करू शकते म्हणजे संविधान आहे,सर्व जाती धर्मातील विध्यार्थी एकत्र एका शाळे मध्ये शिकू शकतात म्हणजे संविधान आहे,अन्याया विरुद्ध लढू शकता म्हणजे संविधान आहे,तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे संविधान आहे.*  यावेळी *माजी उपनगराध्यक्ष...

परभणी घटनेतील मयत तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी लोहा शहर कडकडीत बंद.

Image
  परभणी घटनेतील मयत तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणी लोहा शहर कडकडीत बंद. ------------------------------  लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  ------------------------------                  परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या झालेल्या विटंबना प्रकरणी परभणी येथील आंबेडकरी अनुयायांच्या वतीने निषेध नोंदवित असताना पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्यात पस्तीस वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. १६ रोजी सोमवारी मराठवाडा बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत लोहा शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभाग नोंदवल्याने शहर कडकडीत बंद होते.             लोहा शहरातील क्रांतीसुर्य बुद्ध विहार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परभणी येथील घटनेचा निषेध नोंदविला. परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. १६ रोज...

माजी विद्यार्थ्यांचे रंगले रोप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन.

Image
  माजी विद्यार्थ्यांचे रंगले रोप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन. ------------------------------ नांदेड़ प्रतिनिधि  ------------------------------ नांदेड : माधवराव पाटील माध्यमिक शाळा व कमला नेहरू कन्या शाळा एसएससी बॅच 1999-2000 चा रौप्यमहोत्सवी स्नेहमेळावा 15 डिसेंबर 2024 रोजी नांदेड येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाळेला भेट देऊन झाली, यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले वर्ग, खेळाचे मैदान पाहून विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनातील दिवस पुन्हा जिवंत झाल्याचा अनुभव घेतला व   नैवेद्यम बँक्वेट हॉल येथे हा स्नेहामिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांवर पुष्पवर्षाव करून झाली. या निमित्ताने उपस्थित माजी मुख्याध्यापक राठोड , मुखध्यापक एडके आणि मुख्याध्यापिका श्रीमती बच्चेवर  व इतर शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांनीही आपल्या विद्यार्थ्यांना पाहून व हितगुज करून जुन्या आठवणींना उजाळा दिला .यावेळी जुन्या नव्या आठवणींना उधान आले होते. याचवेळी स्नेहमेळाव्यात विविध मनोरंजक कार्यक्रम, संवाद आणि प्रेरणादायी...

महावितरणचा भोंगळ कारभार कांटे बुरंबाळ मार्गावर कोसळले विद्युत खांब.

Image
  महावितरणचा भोंगळ कारभार कांटे बुरंबाळ मार्गावर कोसळले विद्युत खांब. -------------------------------------  शाहुवाडी तालुका प्रतिनिधी  आनंदा तेलवणकर -------------------------------------  अपघाताच्या घडतायत घटना, विद्युत प्रवाह नियमित करण्याची मागणी. शाहूवाडी : कांटे बुरंबाळ मार्गावर शेती पंपासाठी असणाऱ्या विद्युत वाहिनीचे खांब कोसळले असून या मार्गावरील प्रवास धोकादायक ठरत आहे. या घटनेला एक आठवडा होऊन सुद्धा महावितरणचा एकही कर्मचारी घटनास्थळी फिरकला नसल्याने महावितरण चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.        गेल्या आठवड्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस व जोरदार वादळ यामुळे घनदाट जंगलातून असलेल्या कांटे ते बुरंबाळ या मार्गावरील शेतीपंपासाठी असलेल्या विद्युत वाहिनीवर झाडे पडल्याने वाहिनीचे सहा खांब मोडून पडले असून विद्युत वाहिनीच्या सर्व तारा रस्त्यात पसरल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी या तारांमध्ये दुचाकी अडकून बुरंबाळ मधील एका दुचाकी स्वराचा अपघात झाला आहे, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच या मार्गावर दैनंदिन शालेय विद्यार्थी, नागरिका...

चंद्रकांत दादा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव.

Image
  चंद्रकांत दादा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव. -------------------------------------------- हातकणंगले प्रतिनिधी  विनोद शिंगे -------------------------------------------- कोल्हापूर दिनांक 15 कोल्हापूरचे सुपुत्र मा.नाम चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली या नियुक्ती बद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, चंद्रकांत दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून हा आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, कोल्हापूरच्या सुपुत्राने सलग तिसऱ्यांदा कॅबिनेट पदाची शपथ घेतली आहे यापूर्वी दोन वेळा मिळालेल्या खात्यांची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळले आहे आत्तासुद्धा त्यांच्या मंत्रीपदामुळे कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला तसेच दादा जिल्ह्याचे पालकमंत्री व्ह...

परभणी येथील आंदोलनात तरुणाचा मृत्यू ; कार्यवाहीच्या मागणीसाठी सोमवारी लोहा बंदचे आवाहन .

 परभणी येथील आंदोलनात तरुणाचा मृत्यू ; कार्यवाहीच्या मागणीसाठी सोमवारी लोहा बंदचे आवाहन लोहा,               परभणी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीचे दगडफेक करून नासधूस केल्या प्रकरणी परभणी येथे झालेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत कोठडीत असलेल्या तरुणाचा मृत्यू झाला त्या निषेधार्थ दि. १६ रोजी सोमवारी रिपब्लिकन सेनेच्या वतीने लोहा बंदचे आवाहन केले आहे.                 परभणी येथे एका माथेफिरूने बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतीकृतीची नासधूस केल्याप्रकरणी परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी आंदोलन केले. आंदोलना दरम्यान पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर केलेल्या लाठीहल्यात परभणी येथील उच्चशिक्षित भीमसैनिक तरुण सोमनाथ सुर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यु झाला. त्या प्रकरणी आंदोलनात पोलिसांकडून दाखल केलेले खोटे गुन्हे दाखल करून आंदोलक तरुणांना शहीद होई पर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करावी या मागणीसाठी ...

किरण दादा बगाडे यांनी निवेदन केले सादर.

Image
किरण दादा बगाडे यांनी निवेदन केले सादर. --------------------------------  जावली प्रतिनिधी --------------------------------   जगातील बलाढ्य लोकशाही ज्या संविधानानुसार चालते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले देशाच्या संविधानाची परभणी येथे एका माथेफिरूने विटंबना केली याचा निषेध व्यक्त करत या माथेफिरू ला कठोर शासन झाले पाहिजे  या प्रवृत्ती च्या मागे कोण असेल तर त्याचा पोलिसांनी मुळापर्यंत शोध घ्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष किरणदादा बगाडे यांनी निवेदनाद्वारे केली       जावली तालुक्याचे तहसीलदार हणमंत कोळेकर व सपोनि पृथ्वीराज ताटे यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला संविधान दिले. संविधान रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकांची नैतिक जबाबदारी आहे महाराष्ट्रात महिलांवरील होणारे अत्याचार,महापुरुषांची विटंबना,संविधानाची विटंबना,हे सातत्याने घडत आहे त्याच संविधानामुळेच नागरिकांना हक्क आणि अधिकार प्राप्त करून दिले,त्याच संविधानावर आज संपूर्ण देश चालतो मात्र परभ...

लोहा , कंधार विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 155 कोटी मंजूर.आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश.

Image
लोहा , कंधार विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी 155  कोटी मंजूर.आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश. -------------------------------- लोहा प्रतिनिधि  अंबादास पवार  --------------------------------   सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे केले आहे. सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यासह कंधार आणि लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदार झाला होता . अशा परिस्थितीत आसमानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती . यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकन...

कला महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा.

Image
  कला महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा. ---------------------------- चंदगड प्रतिनिधी  आशिष पाटील  ---------------------------- कोवाड (ता.चंदगड) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि.६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. महाविद्याल्याच्या प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ.ए.के.कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व सांगून त्यांचे विचार समाजाला किती महत्त्वाचे आहेत हे समजावून सांगितले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय सैन्य दलात भरती झालेला महाविद्यालयाचा इतिहास विभागाचा विद्यार्थी कु.केतन कृष्णा पाटील  याचा प्राचार्य डॉ.एम.एस.पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इतिहास विभाग प्रमुख डॉ.व्ही.आर.पाटील  यांनीही त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्याशाखेतील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रास्तविक ड...

शिरोली एमआयडीसी नागाव परिसरात एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या.

Image
  शिरोली एमआयडीसी नागाव परिसरात  एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या. -------------------------------- शिरोली प्रतिनिधी अमित खांडेकर  -------------------------------- सोमवारी पहाटे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रात्रीत तीन धाडसी चोऱ्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सुमारे दहा लाखाची रोख रक्कम चोरीला गेली आहे. घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की शिरोली पुलाची येथील कोल्हापूर सांगली रोडवर जैन धर्मियांचे  मोठे धर्मस्थळ असलेले जैन मंदिरात  पहाटे 4 च्या सुमारास मागील बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिराच्या कार्यालयातील तिजोरी फोडून सुमारे 7 लाखापर्यंतची रोकड लंपास केली आहे.ही तिजोरी फोडण्यासाठी मोठा दगड व कटवणीचा वापर करण्यात आला त्याचबरोबर या मंदिराच्या शेजारी असणारे प्रसिद्ध भांड्याचे दुकान फोडून तेथील रोख  रक्कम चोरली आहे. तसेच नागाव फाटा नजीक मेनन कॉलनी मध्ये तीन भाडेकरूंचे दरवाजे फोडून रोख रक्कम व किरकोळ दागिने लंपास केले आहेत.  एकाच रात्री तीन चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हाहन दिले आहे.या घटनेमुळे परिसरातील नागरिक भ...

'अमृता'हूनी गोड नाम तुझे 'देवा' रोहित पाटलांची विधानसभेत टोलेबाजी : एक नंबरवरील वकीलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असुद्या.

Image
 'अमृता'हूनी गोड नाम तुझे 'देवा' रोहित पाटलांची विधानसभेत टोलेबाजी : एक नंबरवरील वकीलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असुद्या. ----------------------------------------  मिरज तालुका प्रतिनिधी  राजू कदम -----------------------------------------         विधानसभा निवडणुकीनंतर पहिलेच विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात आमदार रोहित पाटील बोलत होते. देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून विधानसभेत 'एन्ट्री' केल्यानंतर रोहित पाटील यांनी आपले पहिलेच भाषण गाजवले. भाषणात टोलेबाजी करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच आमदार रोहित पाटील यांचे भाषण ऐकतच राहिले.      विधानसभेतील आपल्या पहिल्या भाषणात आमदार रोहित पाटील म्हणाले, आपल्या देशाने अनेक शाह्या बघितल्या आहेत. मात्र लोकशाही ही अत्यंत महत्त्वाची शाही आपल्या देशाच्या वाटणीला आली. सबंध जगा...

एड्स व टी.बी. चा मुकाबला सर्वानी मिळून करूया : सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) माजी बांधकाम व आरोग्य सभापती.

Image
  एड्स व टी.बी. चा मुकाबला सर्वानी मिळून करूया : सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) माजी बांधकाम व आरोग्य सभापती. ------------------------------------ शाहुवाडी तालुका प्रतिनिधी  आनंदा तेलवणकर ------------------------------------- शाहुवाडी : ग्रामीण रूग्णालय मलकापूर यांच्या वतीने जागतिक एड्स दिन व 100 क्षयरोग मोहिम निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता ,सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी बांधकाम व आरोग्य सभापती मा.श्री सर्जेराव बंडू पाटील ( पेरीडकर ) होते तसेच ग्रामिण रुग्णालय मलकापूर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.बी.एस.लाटवडेकर,तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती शाहुवाडी डॉ.एच.आर.निरंकारी, डॉ. अभिषेक चावरे यांची उपस्थिती होती .डॉ.लाटवडेकर यांनी एडस व टी.बी ची माहिती दिली .डॉ.निरंकारी यांनी क्षयरोग मोहिमे विषयी माहिती यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.सर्जेराव पाटील यांनी एडस व टी.बी मुक्त आपला तालुका होण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले यावेळीं डॉ. वर्षा ठोंबरे , डॉ. जयंत ठोंबरे , डॉ.सुहास कुलकर्णी,डॉ. स्मिता कांबळे , डॉ. पुजा पांडव , डॉ. रेवती ,डॉ. आलेकर , श्...

उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात एड्स जनजागृती

 *उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात एड्स जनजागृती* रिसोड: प्रतिनिधी. रणजीत सिंह ठाकुर   उत्तमचंद बगडिया महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना रेड रेबीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक एड्स निर्मूलन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना एचआयव्ही विषयी माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद कुळकर्णी होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयसीटीसी च्या अंजली गायकवाड मॅडम ह्या होत्या कार्यक्रमाला त्यांच्यासह तंत्रज्ञ निखाडे साहेब व एनजीओ श्री शेजुळ विशेष उपस्थितीत होते .प्राचार्य कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात राष्ट्रीयसेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी गावात जाऊन एचआयव्ही चाचणी करणे आवश्यक आहे अशी जनजागृती केली पाहिजे .पूर्णपणे बरा करण्यासाठी आजही कोणतेही औषधाचा शोध लागला नाही मात्र बाधित व्यक्तीच्या आयुष्य वाढवण्यासाठी विविध औषध उपचार सध्या उपलब्ध आहे योग्य काळजी व दक्षता घेतल्यास या रोगाची निर्मूलन शक्य आहे असे म्हटले तर प्रमुख मार्गदर्शिका ICTC अंजली गायकवाड मॅडम यांनीआपल्या समउपदेशात एड्सची लक्षणे ...