शिरोलीत वर्चस्ववादातून टोकदार हत्याराने तीन आलिशान गाड्या फोडल्या,तसेच आदमापूर येथे परस्परांवर गोळीबार.

 शिरोलीत वर्चस्ववादातून टोकदार हत्याराने तीन आलिशान गाड्या फोडल्या,तसेच आदमापूर येथे परस्परांवर गोळीबार.


----------------------------------

शिरोली प्रतिनिधी

अमित खांडेकर 

----------------------------------

स्क्रॅप व्यवसायाचे नाव घेतले जात असले तरी नेमके कोणत्या कारणाने टोळी युद्ध भडकत आहे याच्या मुळाशी पोलिसांनी जानेची गरज आहे.

पुलाची शिरोली येथे शुक्रवारी रात्री  ग्रामपंचायत जवळ राहणाऱ्या माजी उपसरपंच अविनाश कोळी व अभिजीत कोळी यांच्या मालकीच्या दोन आलिशान गाड्या टोकदार हत्याराने  फोडल्याची घटना घडली आहे.

अभिजित कोळी व अविनाश कोळी हे दोघे भाऊ शिरोली ग्रामपंचायत जवळ राहतात. या दोघांचा स्क्रॅप चा व्यवसाय आहे. तसेच विनायक लाड याचाही स्क्रॅप चा व्यवसाय आहे. या दोघांच्या मध्ये बऱ्याच दिवसापासून व्यवसायावरून व आर्थिक कारणावरून वाद आहे.

नागाव येथे सातपुते गॅंगने विनायक लाड वर तलवार हल्ला केला यामध्ये अविनाश व अभिजित कोळी चा हात असल्याने

 शुक्रवारी रात्री विनायक लाड, अनिकेत लाड व अनिल माने उर्फ जॅकी यांनी अविनाश व अभिजित च्या दारात लावलेल्या एम एच ०९ ०७६४ या फोर्ड ॲस्पायर या गाडीवर व एम एच ०९ एफ एल ००४७ या फॉर्च्यूनर गाडीच्या समोरच्या व  उजव्या बाजूच्या काचा एडक्याने फोडल्या आहेत.दोन्ही गाड्यांचे पत्रे चेपवले आहेत. बोनेटवर टोकदार हत्यार मारून पत्रा फाडून चेपवला आहे.

तसेच एम एच ०९ जे के ००४७ या थार गाडीच्या पाठीमागील व दोन्ही बाजूच्या काचा  व आरसे फोडले आहेत.

यामध्ये सुमारे तीनही गाड्यांचे मिळून अंदाजे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान केले आहे.तसेच त्यांच्या2 घरावर दगडफेक करून दहशत माजवून तुमच्या कुटूंबियांना सोडणार नाही अशी धमकी दिली आहे

.याप्रकरणी अभिजित कोळी रा.पुलाची शिरोली यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पीएसआय प्रमोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

तसेच शनिवारी सकाळी विनायक लाड हा आदमापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर अविनाश कोळी याने श्रीकांत मोहिते रा.पुलाची शिरोली याला 5 लाखांची सुपारी देऊन विनायक लाड याला मारण्यास सांगितले. विनायक लाड आदमापूर येथील थांबलेल्या हॉटेल जवळ श्रीकांत मोहिते व विनायक लाड समोरासमोर आले असता दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला आहे.यामध्ये श्रीकांत मोहिते हा जखमी झाला आहे.या घटनेमुळे आदमापूर व शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला असून  स्थानिक गुन्हे अन्वेषण ने संशयितांना ताब्यात घेतले आहे.उपसरपंच अविनाश कोळी हा पसार आहे.

शिरोली एमआयडीसी पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतली असती  ही घटना घडली नसती.

गुरुवारी रात्री नागाव येथे हल्ला झाल्यानंतर शिरोली एमआयडीसी पोलिसांनी पार्श्वभूमी माहीत असून सुद्धा संशयितांना वेळीच ताब्यात घेणे गरजेचे होते.नागाव येथील घटनेवेळी हद्दपार रोहित सातपुते या परिसरात हजर होता, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. पण पोलिसांनी जुजबी कारवाई केली आहे ,त्यामुळेच शिरोली येथील गाड्यांची तोडफोड, आदमापूर गोळीबार या घटना घडल्याचे बोलले जात आहे.यापुढे पोलीस  काय भूमिका घेतात,कशा स्वरूपाची कारवाई करतात ,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.