भुदरगड किल्यावर पोलीस मित्र संघटनेकडून एक दिवसाची स्वच्छता मोहीम संपन्न

 भुदरगड किल्यावर पोलीस मित्र संघटनेकडून एक दिवसाची स्वच्छता मोहीम संपन्न.

----------------------------------------------------

भूदरगड प्रतिनिधी- स्वरुपा खतकर.

-----------------------------------------------------------

भुदरगड तालुक्यातील भुदरगड या किल्ल्यावर डी. एस. राठोड फौंडेशन व मार्शल योगा अकॅडमी संचलित 

महाराष्ट्र पोलीस मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गेली अनेक वर्षापासून पोलीस मित्र संघटना विविध सामाजिक कार्यात नेहमीच सहभागी असते आरोग्य व रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, गडकिल्ले स्वच्छता, मंदिर, जत्रा, मिरवणुक,  सण व गर्दीच्या ठिकाणी निशुल्क बंदोबस्त, पोलीस आणि जनतेतील समन्वय राखणे, महिला एकत्रिकरण व साक्षरता असे अनेक कार्ये संघटना करत आहे.

  स्वच्छतेचा वसा घेतलेल्या पोलीस मित्र संघटनेने भुदरगड संवर्धनाच्या दृष्टीने करवीर सचिव लता चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आखणी करून गडावरील विविध भागातील व मंदिर परिसरातील स्वच्छता केली. स्वच्छता मोहिमेत प्लॅस्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आला. पेठ शिवापूर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले.

स्वच्छता मोहिमेनंतर भैरवनाथ मंदिरच्या प्रांगणात समारोप बैठक घेण्यात आली.या बैठकीत गडहिंग्लज विभागचे पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले, कोल्हापूर पोलीस उपअधीक्षक सदाशिव सदांनशिव , भुदरगड गटविकास अधिकारी डॉ.शेखर जाधव , पोलीस मित्र मुख्य अधिकारी डॉ सुरेश राठोड,मुख्य समन्वयक डॉ. सुशील आग्रवाल यांनी या उपक्रमाबद्दल पोलीस मित्र संघटनेचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या उपक्रमास बिद्री सरपंच मधुकर देऊळकर, ग्राम सेविका उर्मिला वाघमारे,जिल्हा अध्यक्ष संभाजी पाटील, प्रकाश खतकर, संजय पाटील,बाजीराव पाटील, खंडेराव देसाई ,लहू कांबळे दत्तात्रय भेंडवडेकर, सूर्यकांत कुंभार ,मच्छिंद्रनाथ पाटील आदींचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी विविध तालुक्यातील पोलीस मित्र उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.