डॉक्टर सुभाष पाटील हॉस्पिटल समोर विश्रामबाग चौकात नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास-आरोग्य विभागाचे झोपेचे सोंग-डॉग व्हॅन गायब लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे
डॉक्टर सुभाष पाटील हॉस्पिटल समोर विश्रामबाग चौकात नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास-आरोग्य विभागाचे झोपेचे सोंग-डॉग व्हॅन गायब लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे
-------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
-------------------------------------
विश्रामबाग चौकातील डॉक्टर सुभाष पाटील दवाखान्यासमोर आणि विश्रामबाग चौकात मोकाट कुत्र्यांचे अनेक कळप फिरत असून यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदरची कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत. याआधी या मोकाट कुत्र्यांकडून लहान बालकांसह जेष्ठ नागरिकांवर हल्ले झाल्याचे प्रकार घडले आहेत. या कुत्र्यांमुळे अनेक अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी झाल्याचेही प्रकार घडले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने झोपेचे सोंग घेतले आहे का? असा सवाल लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला आहे .
आत्तापर्यंत आरोग्य विभाग काय करीत आहे? मोकाट कुत्र्यांचा अजून बंदोबस्त का झाला नाही?महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या प्रकाराकडे तसेच आरोग्य विभागाकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.अशी मागणी ही मनोज भिसे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment