हसणे येथील टस्कर हत्तीचा बंदोबस्त येत्या सोमवारी पर्यंत करणार वन्यजीव अधिकारी दाजीपूर.

 हसणे येथील टस्कर हत्तीचा बंदोबस्त येत्या सोमवारी पर्यंत करणार वन्यजीव अधिकारी दाजीपूर.

------------------------------

राधानगरी प्रतिनिधी 

विजय बकरे

------------------------------

राधानगरी तालुक्यातील हसणे येथे गेली पाच महिने वास्तव्यास असणारा ठस्कर हत्तीचा बंदोबस्त येत्या सोमवार पर्यंत करणार असल्याचे दाजीपूर वन्यजीव कार्यालयाचे अधिकारी यांनी आयोजित केलेल्या हसणे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना जाहीर केले जर सोमवार पर्यंत ् टस्कर हत्तीचा बंदोबस्त झाला नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी वन्यजीव अधिकाऱ्यांना  देण्यात आला 

हसणे येथे गेले पाच महिने टस्कर हत्ती वास्तव्यास असून त्याने हसणे तांब्याचे वडी हरिजन वाडा येथील ग्रामस्थांनी केलेली शेती पूर्ण उध्वस्त केली असून ग्रामस्थांनी टस्कर हत्तीचा बंदोबस्त तातडीने करण्यात यावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्या संदर्भात दाजीपूर वनजीव अधिकारी यांनी तातडीने हसणे ग्रामस्थांची बैठक घेऊन येत्या सोमवार पर्यंत टस्कर हत्तीचा बंदोबस्त करतो असे आश्वासन बैठकीत अधिकारी यांनी दिल्यामुळे हसणे ग्रामस्थांनी आत्मदहन करण्याचा निर्णय तात्पुरता थांबवण्यात आला असून असून येत्या सोमवार पर्यंत टस्कर हत्ती चा बंदोबस्त नकेल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच सूर्यकांत सावंत पंढरीनाथ पाटील यशवंत कांबळे पुन्हा वन्यजीव अधिकाऱ्यांना दिला आहे


या बैठकीस वन्यजीव चे सहायक वनरक्षक सौ प्रियांका पवार वन्यजीव चे वन्यक्षेत्रपाल अजित माळी हसण्याचे वनपाल अमोल चव्हाण माजी सरपंच सूर्यकांत सावंत ग्रामपंचायत सदस्य सत्यवान नरसाळे शरद पाटील लक्ष्मण सावंत पंढरीनाथ पाटील यशवंत कांबळे विश्वनाथ सावंत इत्यादी हसणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.