शाहूपुरी पोलिसांकडून अवैद्य फटाका विक्री प्रकरणी दोघांच्या वर गुन्हा दाखल

 शाहूपुरी पोलिसांकडून अवैद्य फटाका विक्री प्रकरणी दोघांच्या वर गुन्हा दाखल.

--------------------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी - अमर इंदलकर 

 --------------------- ------

सातारा जिल्ह्यात काही दिवसापूर्वीच काही प्रकरणात जीवघेणे प्रकार पाहायला मिळाले होते त्याअनुषंगानेच पोलीस अधीक्षक यांनी सातारा जिल्हा येथे अवैद्य फटाका विक्री दारू विक्री यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सहकार्याना कारवाई सूचना देऊन स्वतः कारवाईकरिता शाहूपुरी पोलीस स्टेशन हद्दीत रवाना झाले असता त्यांना गोपनीय माहितीदारामार्फत 18 शुक्रवार पेठ सातारा येथील क्रांतीस्मृती दुकानाविषयी माहिती मिळाली असता प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता सदर दुकान चालकाकडे फटाका विक्री परवाना नसल्याचे आढळून आले त्याच्या कडे लायसन्स विषयी चौकशी केली असता त्यांच्याकडे  परवाना नसल्याचे सदर दुकान मालकाने सांगितले  त्यास त्यांचे नाव विचारले असता आपलं नाव प्रकाश वसंत कोळेकर सांगितले व त्यांचा मुलगा गणेश प्रकाश कोळेकर हा दुकान चालवतो म्हणून सांगितले त्यामुळे दुकानात ठेवलेल्या फटाक्याचा तलाठी शेटे यांनी दोन पंचा समक्ष  पंचनामा केला  पोलिसांनीही पंचनामा करून दुकान सील केले आहे. सदर दुकानात अंदाजे रक्कम 25-30 हजार रुपये किमतीचे फटाके पंचनाम्यात नमूद केले असून प्रकाश कोळेकर व गणेश कोळेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. सदर कारवाई शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार  यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.