वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र पेंडाखळे वनपरिमंडळ सावर्डी यांच्या वतीने विविध शाळांमध्ये वन्य जीव सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 वन विभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र पेंडाखळे वनपरिमंडळ सावर्डी यांच्या वतीने विविध शाळांमध्ये  वन्य जीव सप्ताह कार्यक्रम मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

--------------------------------- 

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी 

आनंदा तेलवणकर

--------------------------------- 

शाहुवाडी : मा. उपसंरक्षकसो श्री गुरुप्रसाद व मा. सहाय्यक वनसंरक्षकसो कमलेश पाटील तसेच मा. वनपरिक्षेत्र अधिकारीसो श्रीमती सुषमा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह कार्यक्रम १ ऑक्टोबर ते ७ आक्टोबर  असा कार्यक्रम चालु असून सह्याद्री माध्यमिक विद्यालय अणुस्कुरा निनाई माध्यमिक विद्यालय बुरंबाळ विध्या मंदीर , पाल , 

सावर्डी  बर्की या शाळेंमध्ये विविध उपक्रमांद्वारे वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयी मार्ग दर्शन केले तसेच स्वच्छता मोहीम राबिवने व त्याचे महत्व पटवून पटवून सांगणे तसेच जंगलात लावलेल्या आगीपासून जंगलाची हानी कशी व किती होते तसेच याच्यापासून वन्य प्राण्यांचे काय हाल होतात  तसेच जंगलाचा ऱ्हास का होतो पाऊस कमी जास्त का पडतो तसेच झाडांपासून आपल्याला ऑक्सीजन  कसा मिळतो अशा अनेक विषयी जनजागृती केली यावेळी वनपरिमंडळ अधिकारी श्री दिलीप आरेकर  वनरक्षक जालिंदर कांबळे, वनरक्षक गोविंदा शेळके , अनिकेत पाटील , वनरक्षक प्रमोद माने तसेच वनसेवक राजाराम काटकर  बाळू पाटील गुंडा कांबळ  अनिल चव्हाण  बंडा पाटील तसेच आर आर टी टीम पेंडाखळे ऑफिसचे अनिल पाटील  , करण पाटील , अर्जुन पाटील  योगेश गुरव यांनी सापांविषयी माहिती दिली

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.