लिंगनूरमध्ये आजपासून नवदुर्गा नवरात्रोत्सव.

 लिंगनूरमध्ये आजपासून नवदुर्गा नवरात्रोत्सव.




--------------------------------------

मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम 

--------------------------------------

आरग : लिंगनूर (ता. मिरज) येथील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष व माजी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र नाईक यांच्या वतीने दरवर्षी नवदुर्गा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. उद्या (ता. ३) सायंकाळी देवीची मूर्ती प्रतिष्ठापना, शनिवारी (ता. ५) सायंकाळी धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, रविवारी (ता. ६) सकाळी ९ वाजता बैलगाडी शर्यत, बिनदाती हलका घोडागाडी शर्यत, सोमवारी (ता. ७) सायंकाळी शिवचरित्र पोवाडे व स्फूर्तिगीतांचा कार्यक्रम, मंगळवारी (ता. ८) रात्री गोंधळाचा कार्यक्रम, बुधवारी (ता. ९) दुपारी ३ वाजता धनगरी ढोल वादन स्पर्धा, गुरुवारी (ता. १०) सायंकाळी चला खेळूया खेळ पैठणीचा कार्यक्रम, शुक्रवारी (ता. ११) सकाळी झिक सॅक ट्रॅक्टर स्पर्धा होतील. रविवारी (ता. १३) देवीची स्वाद्य मिरवणूक व विसर्जन सोहळ्यानंतर नवरात्रोत्सवाचा

समारोप होईल.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.