सात लाख मे.टन गाळप उदिष्ट गाठणार - चंद्रदिप नरके.

सात लाख मे.टन गाळप उदिष्ट गाठणार - चंद्रदिप नरके.

-----------------------------------

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

-----------------------------------

कुंभी कासारी साखर कारखाना २०२४/२५ बॉयलर अग्नी प्रदिपण समारंभ.

कुंभी कासारी साखर कारखान्याने एक रक्कमी उच्चांकी एफआरपी,तोडणी वहातूक बीले व इतर देणी देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यामुळे सभासद,बिगर सभासद शेतकऱ्यांचा विश्वास कायम राहिला आहे.मागील वर्षी यामुळेच सात लाख ऊस गाळप उदिष्ट गाठले आहे. यावर्षी महापूर व अतिवृष्टी यामुळे ऊस उत्पादनात घट होणार असली तरी शेतकऱ्यांच्या विश्वासावर याही वर्षी सात लाख गाळप उद्दिष्ट गाठणार असल्याचे अध्यक्ष माजी आ. चंद्रदिप नरके यांनी सांगितले

   कुंभी कासारी कारखान्याच्या  २०२४/२५ हंगामातील  बॉयलर अग्नीप्रदीपन संचालक सर्जेराव हुजरे व त्यांच्या सुविद्य पत्नी इंदूबाई हुजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर पत्रकार परिषदेत माजी आ.चंद्रदीप नरके बोलत होते.उपाध्यक्ष राहूल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   यावेळी नरके म्हणाले एकरक्कमी एफआरपी वेळेत देण्याची परंपरा कुंभी कासारीने कायम ठेवली आहे. सध्या साखर व उपपदार्थ यांना मिळणारा दर व एफआरपी यात तफावत असल्याने ऊसाच्या रसापासून निर्माण झालेल्या इथेनॉल,बी व सी हेवी मोलँसिस इथेनॉलला केंद्राकडून देण्यात येणाऱ्या दरात प्रति लिटर ५ रूपये व  साखरेचा हमी भाव ४० रूपये प्रतिकिलो करावा अशी मागणी केली.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखरेला दर चांगला असून साखर निर्यातीसाठी केंद्र शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी केली.

     यावेळी सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धिरजकुमार माने,सचिव प्रशांत पाटील,चीफ इंजिनिअर संजय पाटील, युवराज भांदिगरे, कामगार प्रतिनिधी,विविध संस्थाचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


कुंभी कासारी साखर कारखाना २०२४/२५ हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदिपण समारंभ संचालक सर्जेराव हुजरे,पत्नी इंदुबाई हुजरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अध्यक्ष माजी आ. चंद्रदिप नरके,उपाध्यक्ष राहूल खाडे सर्व संचालक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.