कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न.

 कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे लोकार्पण सोहळा संपन्न.

-------------------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-------------------------------------- 

कुंभोज येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा झाला, यावेळी खासदार धैयशील माने माजी खासदार राजू शेट्टी ,आमदार राजू बाबा आवळे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डी सी पाटील , बाबासाहेब पाटील,माजी सभापती पद्माराणी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले अरुण पाटील ,दलित मित्र अशोक माने ,सरपंच स्मिता चौगुले, उपसरपंच अशोक आरगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

      

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार धैरशील माने म्हणाले की दवाखान्याची इमारत किती सुंदर आहे हे महत्त्वाचे नसून दवाखान्यात काम करणारे कर्मचारी व डॉक्टर किती गुणवंत आहेत यावर त्या दवाखान्याचे महत्त्व अवलंबून असते. परिणामी दवाखान्यांमध्ये सर्व सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून येणाऱ्या काळात दवाखान्याकडे येणारा रस्ता दवाखान्यासाठी आवश्यक असणारे कंपाउंड व अन्य सेवा सुविधा पुरविल्या जातील असे आश्वासन ही यावेळी खासदार धैयशील माने यांनी दिले. 

    यावेळी बोलताना आमदार राजू बाबा आवळे यांनी हातकणंगले मतदारसंघात कुंभोज येथे आयुष्यमान भारत मंदिराचे आज लोकार्पण सोहळा संपन्न झाला असून याचा लाभ परिसरातील अनेक गावातील नागरिकांना होणार आहे .परिणामी आवश्यक असणाऱ्या विकास कामासाठी तात्काळ फंड उपलब्ध करून दिला जाईल तसेच साईड कंपाउंड साठी दहा लाख रुपये चा निधी घोषित केला. 

      यावेळी माजी शिक्षण सभापती व जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण यादव यांनी आपण दिलेला शब्द पाळला असून आपल्या कारकीर्दीमध्ये सदर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पायाभरणीचा शुभारंभ माजी आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांच्या उपस्थितीत झाला होता. परिणामी सदर काम आज पूर्ण होत असून मी या मतदारसंघाचा जिल्हा परिषदेचा प्रतिनिधी असल्याने मला  समाधान व्यक्त होत आहे. 

     यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील यांनी बोलताना कोणते काम कोणाच्या कार्यकाळात पूर्ण झाली यापेक्षा ते काम करण्यासाठी कोणाकोणाचे सहकार्य लाभले ते महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींची नेमणूक ही काम करण्यासाठीच असते.परिणामी सर्वच राजकीय गटाच्या नेत्यांचे हे आरोग्य केंद्र उभा करताना सहकार्य लाभले असून केवळ आरोग्य केंद्र उभा करून उपयोग नाही तर ते सुसज्य केंद्र बनवणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींनी इथून पुढे लक्ष घालून आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा पुरवाव्यात असेही ते म्हणाले. 

      यावेळी कार्यक्रमाचे स्वागत महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी केली यावेळी किरण माळी यांनी बोलताना सदर आरोग्य केंद्र निर्माण करत असताना सर्वच गटातटाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींचे व ग्रामपंचायत सरपंच  पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले व त्यांच्या सहकार्यातूनच आज जवळजवळ साडेतीन कोटीची सुसज्ज अशी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी राहिली आहे असे ते म्हणाले 

     यावेळी जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले ,माजी सरपंच प्रकाश पाटील, श्रीकांत माळी, माजी सरपंच किरण नामे ,अविनाश बनगे, सावकार मदनाईक,माजी सरपंच जयश्री जाधव ,माधुरी घोदे ,विशाखा माळी ,जयश्री महापुरे, पौर्णिमा भोसले ,सदाशिव महापुरे, दावीत घाटगे ,आप्पासाहेब पाटील, अनिकेत चौगुले ,अजित देवमोरे, अमरजीत बंडगर ,भारती पोतदार ,शुभांगी माळी,अमर पाटील ,सुनील वाडकर,धनाजी तिकडे, सरपंच दिपक पाटिल हिंगणगाव, समुदाय वैद्यकीय अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज पाटील संघटक डॉक्टर सत्यजित तोरस्कर, डॉक्टर श्रेयश चौगुले , कुंभोज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोडबोले. हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी दातार,तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेतील सर्व आरोग्य कर्मचारी ,अधिकारी कुंभोज ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका ,अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.