जावली तालुक्यातील मंडळांनी आगामी नवरात्री उत्सव नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

 जावली तालुक्यातील मंडळांनी आगामी नवरात्री उत्सव नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

------------------------------------

जावली प्रतिनिधि 

शेखर जाधव

------------------------------------

/मेढा  दि.01. आगामी नवरात्र उत्सव अनुषंगाने मेढा पोलीस स्टेशन हद्दीतील नवरात्र उत्सव साजरा करणारे मंडळे तसेच पोलीस पाटील यांची मिटिंग घेण्यात आली.

मंडळानी स्टेज बांधण्यासाठी रस्ता बंद होईल असा बांधू नये सजावट करताना फक्त पडद्याचाच वापर न करता पावसाळी दिवस असल्यामुळे पत्र्याचा वापर करावा सर्व मंडळांनी रीतसर परवानग्या घ्याव्यात .

तसेच मंडळांनी समाज उपयोगी कार्यक्रम जास्तीत जास्त करावे त्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर इ सारख्या कार्यक्रमाचे आयोजन करावे.कार्यक्रमात डीजे/डॉल्बीचा वापर करता येणार नाही. पारंपारिक वाद्य  मिरवणूक सामील करून घ्यावी तसा आग्रह धरावा तसेच मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊ नये याकरिता नवरात्र उत्सव मंडळाने विद्युत पुरवठा निर्दोष असल्याबाबत महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे

उत्सव काळामध्ये होणारे कार्यक्रमाबाबत आगाऊ माहिती पोलीस स्टेशनला देणेत यावी  . 

दुर्गादौड दरम्यान शस्त्रांचा वापर  करू नये. 


कोणत्याही समाजामध्ये जातीय तेड निर्माण होईल असे कृती करू नये.


महिला मुलींची छेडछाड होणार नाही याची दक्षता घेणे तसेच घेण्यात येणारे कार्यक्रम विहित वेळेत  संपवावेत .

दुर्गामुर्ती जवळ  24 तास स्वयंसेवक नेमावा.तसेच  पोलीस पाटील यांनी मंडळा सोबत काम करण्याचे आहे.दांडिया चा कार्यक्रम वेळेत संपवणे बाबत तसेच मुलींची छेडछाड होणार नाही याबाबत सूचना दिल्या.

दुर्गादौड दरम्यान वाहतुकीला अडचणी होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या.तसेच नवरात्र उत्सव कालावधीत नवरात्र मंडळांनी मूर्तीवरील दागिने यांचे संरक्षण करावे अशा सूचना पी वाय ताटे

सहाय्यक पोलीस निरीक्षक

मेढा पोलीस स्टेशन यांनी 

 दिल्या .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.