घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार.

 घोडावत विद्यापीठाला टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार.

----------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

----------------------------------

अतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठाला शैक्षणिक आणिसह-अभ्यासक्रमातील उत्कृष्टतेसाठी टाइम्स ऑफ इंडिया च्या वतीने यावर्षीचा टाइम्स एज्युकेशन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील कार्यक्रमात अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू प्रा.उद्धव भोसले यांनी बॉलिवूड स्टार कुणाल कपूर याच्या हस्ते  स्वीकारला.

         संजय घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत आहे .

       शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कार्यशाळा,व्याख्याने, प्रकल्प आधारित प्रात्यक्षिके व विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सह अभ्यासक्रमातून शिक्षण देण्यात येत आहे. त्यासाठी उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.यामुळेच हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती टाइम्स संस्थेकडून देण्यात आले.

        या पुरस्काराबद्दल बोलताना अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.जागतिक स्तरावर विद्यापीठ नवा रूपाला आणणेचे आमचे प्रयत्न आहेत. विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले यांच्या प्रयत्नातून विद्यापीठात विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत.त्याचा फायदा जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना होत आहे.

      या पुरस्काराबद्दल सर्व संस्था संघटना यांचेकडून घोडावत विद्यापीठावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.