दृढ इच्छा शक्ती ने यश प्राप्त होते : गोविंद सदामते.
दृढ इच्छा शक्ती ने यश प्राप्त होते : गोविंद सदामते.
--------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
--------------------------------
वाई दि. २४ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालय, वाई येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व स्कोप हाय यांच्या संयुक्त विद्यमाने “प्री प्लेसमेंट इंडक्शन प्रोग्राम” चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्कोप हाय चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोंविद सदामते यांनी विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये संधी मिळवण्यासाठी कोणकोणते कौशल्य आवश्यक आहेत या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री भिमराव पटकुरे व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हनुमंत कणसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपले विचार मांडताना श्री सदामते म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर राहणे आवश्यक आहे तरच नोकरीच्या संधी मिळवता येतील. येणाऱ्या काळात कौशल्याभिमुख नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादित केले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तीमत्व ओळखून आपले स्पेशलायझेशन निवडावे व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थार्जनाच्या संधी प्राप्त होतील. अध्यक्षीय समारोपामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये असणाऱ्या संधीचा शोध घेऊन आपल्या कौशल्याने संधी मिळवाव्यात व त्यासाठी खडतर परिश्रम करावेत. बदल स्विकारणे हे यश मिळवण्यासाठी अत्यावशक आहे. या प्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रो. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री भिमराव पटकुरे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाचे संयोजक श्री संदीप पातुगडे यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले . श्री जयवंत पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. या कार्यक्रमाचे आभार श्रीमती दिपाली चव्हाण यांनी मानले तर सूत्रसंचालन श्रीमती श्रुती यादव यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री रविंद्र जमदाडे, श्रीमती प्रज्ञा पवार व श्रीमती रेखा भोसले तसेच वाणिज्य मंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले . सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment