शहा विद्यामंदिर बाहुबली मध्ये वाचन प्रेरणा दिन, माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व जागतिक हात धुवा दिन कार्यक्रम संपन्न.

 शहा विद्यामंदिर बाहुबली मध्ये वाचन प्रेरणा दिन, माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांची जयंती व जागतिक हात धुवा दिन कार्यक्रम संपन्न.

---------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------       

एम.जी. शहा  विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज, बाहुबली येथे मंगळवार दि. 15 ऑक्टोंबर रोजी माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती, वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. 

      या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे हे होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मंगलाचरण सादर केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन संपन्न झाले. प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलाजे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले व प्रास्ताविका मध्ये वाचनाचे महत्त्व तसेच हात धुण्याचे फायदे यांची माहिती सांगितले.

विद्यार्थी मनोगतामध्ये अभिनंदन पाटील यांनी वाचनाचे महत्त्व या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तर ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या वेशभूषेमध्ये आदेश निर्वाणे याने मी अब्दुल कलाम बोलतोय यावरती मनोगत व्यक्त केले.

अध्यापक मनोगतामध्ये किरण व्हनवाडे यांनी अब्दुल कलाम यांची माहिती व वाचन प्रेरणा दिन याची सविस्तरपणे माहिती दिली. 

हात धुवा दिनाची माहिती व प्रात्यक्षिक नीता पाटील यांनी सर्व मुलांना  करून दाखवले. 

अध्यक्षीय मनोगतामध्ये मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांनी वाचनाचे महत्त्व व हात धुण्याचे फायदे याची सविस्तरपणे माहिती दिली. इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी वर्गामध्ये एक तास पुस्तक वाचन केले ,यासाठी ग्रंथपाल दीपक चौगुले यांचे सहकार्य लाभले.

 शेवटी आभार विजय ककडे यांनी केले.सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.