वसुली संस्थेचा आत्मा तर प्रशिक्षण काळाची गरज*:- नानासाहेब रूपनवर.

वसुली संस्थेचा आत्मा तर प्रशिक्षण काळाची गरज*:-  नानासाहेब रूपनवर.


मेढा :- महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे, गुलाबराव पाटील प्रशिक्षण संस्था सांगली यांचे वतीने विकास सोसायटी चे सचिव यांचे प्रशिक्षण जावळीची राजधानी मेढा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेढा येथील नवीन इमारतीत  संपन्न झाले त्यावेळी जावळीचे सहाय्यक निबंधक नानासो  रूपनवर म्हणाले संस्था सुस्थितीत ठेवायची असेल तर संस्थेने सभासदांना दिलेत्या कर्जाची वसुली वेळेत होणे महत्वाचे आहे कारण वसुली हा संस्थेचा आत्मा आहे तसेच संस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ प्रशिक्षीत असणे काळाची गरज आहे  सहकार तज्ञ प्रा दंडवत म्हणाले सचिव हा संस्थेचा कणा आहे त्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आहे  संस्थेने कर्ज वाटपा सोबत व्यवसायीक होणे  गरजेचे आहे  त्यासाठी संस्थेने विविध व्यवसाय करावे  . संस्थेचा N PA कमी कसा येईल याकडे संस्थेने पाहीले पाहीजे .  विभागीय विकास अधिकारी राजेंद्र निकम यांनी सर्वांचे स्वागत केले   विकास अधिकारी एजाज बागवान, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ बेलोशे, तालुका अध्यक्ष अनिल धनावडे यांनी मनोगत व्यक्त केले त्या प्रसंगी अक्षय चव्हाण,विकास अधिकारी दत्तात्रय दुर्गावळे, अरुण खटावकर दिपक पार्टे, धनंजय महामुलकर, सर्व सचिव उपस्थित होते प्रशिक्षण केंद्राचे प्रा व्हि जी  शिंदे यांनी आभार मानले

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.