ट्रॅक्टर व दुचाकी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसाच्या हुशारीने पर्दाफाश एकूण चौसष्ट लक्ष सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त ------------

 *ट्रॅक्टर व दुचाकी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीचा फलटण ग्रामीण पोलिसाच्या हुशारीने पर्दाफाश एकूण चौसष्ट लक्ष सत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

----------------------------------------- 

सातारा जिल्हा प्रतिनिधी -अमर इंदलकर

 ----------------------------------------

-फलटण ग्रामीण पोलीस येथे गुन्हा रजिस्टर नोंद 934/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे  कलम 303(2),3(5) चे फिर्यादी विजय दीपक राजेपांढरे  राहणार लक्ष्मीनगर फलटण यांच्या मालकीचा महिंद्रा कंपनीचा अर्जुन  ट्रॅक्टर सोमणथळी तालुका फलटण येथून दिनांक 15/09/2024 सायंकाळी 5ते 16/09/2024 सायंकाळी 7 वाजेपर्यंत च्या दरम्यान चोरीस गेला असल्याचे व कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद केला गेला होता. ट्रॅक्टर चोरीच्या तक्रारी देखील खूप झाल्या होत्या, ट्रॅक्टर चोरटे हे ट्रॅक्टर पार्किंग जागेपासून ते ट्रॅक्टर जिथंपर्यंत चोरी करून न्ह्यायचा आहे तिथपर्यंतच्या जागेची रेखी करून अभ्यासपूर्ण ट्रॅक्टर चोरी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले,पोलिसांनी त्या प्रकारे तपास करून सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून, तसेच अन्य तांत्रिक तपास काढून इतर ठिकाणी झालेल्या गुन्ह्यातील समानता लक्षात घेऊन,संशयित आरोपी (1) सुरज शंकर मदने वय 35वर्षे राहणार- खडकवस्ती  सगोबाचीवाडी, पोस्ट- पणदरे, तालुका- बारामती,जिल्हा- पुणे. (2)आरोपी -अनिकेत महेश जाधव वय20वर्षे,राहणार-खडकवस्ती  सगोबाचीवाडी, पोस्ट- पणदरे, तालुका- बारामती,जिल्हा-पुणे. ह्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीस उडवा उडविची उत्तरे दिली परंतु नंतर पोलिसी खाक्या दाखवल्या नंतर त्यांनी तिसरा साथीदार (3) राजेंद्र मारुती जाधव वय 30 वर्षे राहणार ढाकळे तालुका बारामती यांच्या साथीने एकूण 07 ट्रॅक्टर चोरी आणि 01 मोटार सायकल चोरी अश्या एकूण 08 चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली. यामध्ये ह्या तिन्ही आरोपीकडून हस्तगत माल यादी पुढीलप्रमाणे --चोरीस गेला माल

आहे

पोलीस ठाणे,

ठिकाण

गु.र.नं. व कलम

फलटण ग्रामीण,

सोमंधळी, ता. फलटण


६,००,०००/-रु. महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर

(२)

गु.र.नं. ९३४/२०२४,

बारामती तालुका,

जळगाव कडेपठार, ता.

८,००,०००/-रु. मरिद्रा कंपनीचा ५०५

गु.र.नं. १६/२०२१.

बारामती, जि. पुणे

मॉडेलचा

३)

निगवण, गु.र.नं. ३००/२०२०,

मासीवावाळी, ता. इंदापुर,

जि. पुणे

९,७०,०००/-रु. स्वराज कंपनीचा ७३५

ट्रॅक्टर व निळ्या रंगाचा ब्लास्टिंग कॉम्प्रेसर

जि. पुणे

निगवण, गु.र.नं. ३६८/२०२०,

म्हसोचावाठी, वा. इंदापुर,

८,००,०००/-रु. सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर

मासबद, गु.र.नं.

पळशी, ता. माण, जि.

८,००,०००/-रु. स्थराज कंपनीचा ट्रॅक्टर

१४५/२०१९,

सातारा६

फलटण ग्रामीण,

पवारवाडी, ता. फलटण

गु.र.नं. ९५२/२०२४,

१२,००,०००/-रु. महिंद्र कंपनीचा ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉलि

गिगवण, गु.र.नं.

म्हसोबावाडी, था. इंदापुर, जि. पुणे

१,००,०००/- युनिकॉर्न मोटार सायकल.

३५५/२०२० पढगाव पोलीस

नियुत, ता. बारामती, जि.

ठाणे, जि. पुणे पुणे

३,००,०००/-रु. दोनचाकी डंपिंग ट्रॉलि


म्हसवड

पोलीस

म्हसवड, ता. माण, जि.

७,००,०००/-रु. स्वराज कंपनीचा ७३५ मॉडेलचा ट्रॅक्टर व कॉम्प्रेसर

आरोपीनी गुन्हा करताना वापरलेली मोटार सायकल

२,००,०००/-रु. किंमतीच्या दोन मोटार सायकली.

संशयित आरोपी सुरज शंकर मदने यांचा पुर्वेतिहास पडताळून पहाता चोरी, फसवणुक, पुरावा नाहीसा करणे, चोरीच्या उद्देशाने एकत्र जमणे अशा प्रकारच्या एकुण १८ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग निष्पन्न झालेला आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख. अपर पोलीस अधीक्षक- वैशाली कडुकर.उपविभागीय पोलीस अधिकारी-राहुल घस.यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलीस अमंलदार शांतीलाल ओंबासे, नितीन चतुरे, श्रीनाथ कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, रशिदा पठाण व कल्पेश काशिद यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शांतीलाल ओंबासे हे करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.