महालक्ष्मीदेवीचा आरगला उत्सव भाविकांची मांदियाळी : मंदिर प्रशासनातर्फे सुविधांसाठी जय्यत तयार.

 महालक्ष्मीदेवीचा आरगला उत्सव भाविकांची मांदियाळी : मंदिर प्रशासनातर्फे सुविधांसाठी जय्यत तयार.

----------------------------------

मिरज तालुका   प्रतिनिधी

 राजू कदम 

----------------------------------

आरग,  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आरग- लक्ष्मीवाडी येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र महोत्सवास आजपासून  सुरवात होत आहे. मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज अमावस्येनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी दिसली. 'महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं' चा गजर भाविकांनी केला. सन ११५२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला. अनेक वर्षांपासून देवीचा उत्सव साजरा केला जातो. उत्सवकाळात देवीची नऊ दिवस विविध रुपात पूजा बांधण्यात येते. देवीसमोर पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात येते. पहाटे सव्वापाच व रात्री सव्वाआठ वाजता आरतीसाठी गर्दी असते. गुरव


कुटुंबीयांकडून देवीची दररोज पूजा


केली जाते. देवीसाठी नित्यालंकारांसह


नवरात्रकाळात उत्सवासाठी पारंपरिक


दागिन्यांबरोबरच नऊ दिवस विविध


आरग : महालक्ष्मीदेवीची मूर्ती व मंदिर परिसर. 


रंगांची वस्त्रे परिधान केली जातात.


या नवरात्रीत देवीचे दर्शन घेण्यासाठी सहकुटुंब भाविक सहभागी होतात. नवरात्रोत्सवात खिचडी प्रसादाचे वाटप दररोज करण्यात येते. नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पार्किंग व्यवस्थेसह भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली


आहे. वर्षभर दर मंगळवारी 


मोफत महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. देवीच्या दारात आपट्याची पाने लुटून दसरा सण करण्यात येतो.


बेडग-मंगसुळी जिल्हा महामार्गावर हे स्वयंभू श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात मोठमोठी अशी दौलदार चिंचेचे झाडी आहेत. पुढील नऊ दिवस नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असेल.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.