नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीच्या भक्तीचा जागर.
नवरात्रोत्सवात स्त्री शक्तीच्या भक्तीचा जागर.
-------------------------------
रिसोड/प्रतिनिधी
.रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
:-शहरात सध्या ठिकठिकाणी नवरात्री निमित्त स्त्री शक्तीच्या भक्तीचा जागर अनुभवायला मिळतो आहे. रिसोड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जागृत देवस्थान श्री पिंगळाक्षी देवीच्या दर्शनासाठी सकाळी अमृतवेळी साधारण 3:30 ते 4:00 वाजेपासून पायदळ जाणाऱ्या भक्तांची रिघ लागलेली असते त्यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय असते. नवरात्रीउत्सव हा स्त्री शक्तीच्या शौर्याचा, ममतेचा, श्रध्येचा, सहनशीलतेचा,ज्ञानाचा, साधनेचा, तपस्येचा व त्यागाचा सन्मान करण्याचा उत्सव आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह शहरातील विविध आंतरिक भागात देवींची घटस्थापना करण्यात आली आहे. शिवाजी नगर परिसरातील अष्टविनायक नगर मधील महिलांच्या पुढाकाराने देवींची स्थापना करुन नऊ दिवस नांदेड येथील महाराजांच्या भागवत प्रवचनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तसेच विविध सांस्कृतिक कार्यकर्माचे सुद्धा आयोजन करुन महिलांसाठी अध्यात्मिक मनोरंचनाचे कार्यक्रम घेतले जातात. सध्या सर्वत्र आध्यत्मिक उत्सवाचे व भक्तीच्या शक्तीचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment