स्वयंसेवकांनी किसन वीर आबांच्या स्मारकाची केली स्वच्छता
स्वयंसेवकांनी किसन वीर आबांच्या स्मारकाची केली स्वच्छता
----------------------------------
वाई प्रतिनिधी -कमलेश ढेकाणे
--------------------------------------
‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम
वाई, ता. ०२ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रामस्थ मंडळ,कवठे यांच्या वतीने ०२ ऑक्टोबर महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त, स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह सांगतानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबा यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता, तसेच लक्ष्मीतरू या बहुउपयोगी रोपांची लागवड करून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे, कवठे गावच्या सरपंच मंदाकिनी पोळ, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कोंडिबा पोळ, गौरी डेरे, नम्रता डेरे, लक्ष्मण गायकवाड, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कोचळे, ज्ञानदीपचे संचालक चंद्रकांत शिंदे, ग्रामस्थ डॉ. वृषसेन पोळ, संजय डेरे, भगवान डेरे, गिरीश डेरे, मयुर डेरे, राजेश पोळ, सुनील आगलावे, अविनाश कदम, श्रीमती दीपाली चव्हाण- डेरे यांची उपस्थिती होती.
सचिन पोळ म्हणाले, लक्ष्मीतरू या झाडाचे महत्त्व आपल्याला माहित पाहिजे. हे झाड देशी असून , बहुउपयोगी आहे. ते कमी पाण्यावर येते. या झाडामुळे जमिनीचा पोत सुधारतो. याचे फळ, साल, पाने, फुले बहुगुणी आहेत. प्रत्येकाच्या दारात हे झाड लावायला पाहिजे. महत्वाचे म्हणजे कँन्सर, दमा असे अनेक आजार लक्ष्मीतरू या झाडामुळे बरे होऊ शकतात.
प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती आहे. गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. सत्य व अहिंसा या तत्त्वांबरोबरच स्वच्छतेचाही संदेश दिला आहे. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा मंत्र भारताला दिला. प्रत्येकाने आपापल्या परीने या महामानावांचा विचार समाजात रुजवण्याचा प्रयत्न केल्यास आपला देश प्रगतीपथावर येईल. आपल्या स्वयंसेवकानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर आबा यांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करून समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला आहे. किसन वीर आबांचे चरित्र वाचून आपला स्वातंत्र्याचा इतिहास समजून घेऊया व आपले व्यक्तिमत्व घडवून समाजसेवा करूया.
स्वयंसेवकांचे गट करून स्मारक परिसराची स्वच्छता, झाडांना आळे करून, मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मीतरू या झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऐश्वर्या हिरवे, सिद्धी गायकवाड, समर्थ महांगडे , रितेश सणस, अनुज सुतार , हृतिक नागरे , शिवम वाडकर, प्रणाली विभूते, राणी काळे, भूमी घोडके, सुमित भणगे, धनश्री कोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात एन.एस. एस.च्या स्वयंसेवकानी सहभाग घेतला.
Comments
Post a Comment