कोवाड महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

 कोवाड महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.

-------------------------------------

चंदगड प्रतिनिधी 

आशिष पाटील 

-------------------------------------

कोवाड ( चंदगड ): कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये दि.1६ रोजी इंग्रजी विभागाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एम.एस.पवार होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. संजय पाटील (ग्रामीण सेवा केंद्र संचालक महाराष्ट्र राज्य) हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या विविध स्कॉलरशिप याची माहिती दिली. त्यामध्ये 'कोटक कन्या योजना', 'लखपती दीदी योजना', 'ई सारथी ई वहन योजना', 'टाटा पंख स्कॉलरशिप', मागेल त्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप तसेच घरी राहून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'वर्क फ्रॉम होम' योजना 'निती आयोग, विक्रम साराभाई' योजना 'मुख्यमंत्री युवा योजना' श्रम आणि रोजगार यासारख्या महाराष्ट्र शासनाने CSR (कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सबिलीटी) योजने अंतर्गत सर्व माहिती दिली. बाहेर देशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला सर्वोदय  शिक्षण संस्थेचे सचिव मा.एम.व्हीं.पाटील, ICQR प्रमुख डॉ.ए.एस.अरबोळे, डॉ.व्ही.आर.पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. आभार प्रा. मुकेश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.